शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

थुंकणे व कचरा टाकणाऱ्या २९ उपद्रवींना नागपुरात दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 21:26 IST

शहरातील झाशी राणी चौक सीताबर्डी येथे अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणाऱ्या २९ उपद्रवींवर शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाने कारवाई केली.

ठळक मुद्देझाशी राणी चौकात धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाची कामगिरी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील झाशी राणी चौक सीताबर्डी येथे अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणाऱ्या २९ उपद्रवींवर शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाद्वारे शुक्रवारी सीताबर्डी येथील झाशी राणी चौक, मोरभवन बस स्थानक येथे थुंकणारे व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाकडून संयुक्तरीत्या सीताबर्डी परिसरात उपद्रवींविरोधात कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. तिन्ही झोनच्या पथकातील ४ कर्मचारी असे एकूण १२ कर्मचाऱ्यांनी परिसरात विविध भागात उपद्र्रव करून शहर विद्र्रुप करणाऱ्यांवर दंड ठोठावला.झाशी राणी चौक, मोरभवन परिसर तसेच सिग्नलवर थुंकणाऱ्या १६ व्यक्तींकडून ३२०० रुपये व खर्रा खाऊन पॉलिथिन टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्या १३ जणांवर कारवाई करीत १३०० रुपये असे एकूण २९ जणांवर कारवाई करून ४५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.पुष्पगुच्छांसाठी प्लास्टिकचा वापर केल्यास कारवाई फुल विक्रेत्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या पुष्पगुच्छांना प्लास्टिकचे आवरण लावले जाते. प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकचा वापर प्रतिबंधित असल्याने पुष्पगुच्छांसाठी लावण्यात येणारे प्लास्टिकही प्रतिबंधित आहे. त्यामुळे पुष्पगुच्छाला यापुढे प्लास्टिक लावण्यात येऊ नये. यापुढे पुष्पगुच्छांसाठी प्लास्टिकचा वापर निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद फुल तसेच पुष्पगुच्छ विक्रेत्यांना उपद्रव शोध पथकाद्वारे देण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न