शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उसरे हत्याकांडातील आरोपींना २४ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:30 IST

सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या मुदतीची पोलीस कोठडी मंजूर केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे हुडकेश्वर घटनेतील आरोपींना २३ पर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या मुदतीची पोलीस कोठडी मंजूर केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हुडकेश्वरमधील चेतन मेटांगळे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना २३ ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला.काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची रविवारी सकाळी सदरमधील भारत टॉकीजजवळ आरोपी जेरॉन ऊर्फ बंटी जॉर्ज ऊर्फ सेबिस्टियन निकोलस आणि जतीन ऊर्फ जय जंगम या दोघांनी चाकू तसेच कुऱ्­हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली होती. सदर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रविवारी सायंकाळी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये उसरे यांनी घराच्या बाजूला दुसरे घर विकत घेतले होते. तेथे आरोपी राहत होता. आरोपी घर रिकामे करून देण्यास तयार नव्हता. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. तीन दिवसांपूर्वी उसरे आणि आरोपींमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्यांची हत्या केली. आरोपींनी या कटकारस्थानाची कुणाला माहिती दिली का, त्यांचे कुणी साथीदार आहेत का, त्यांनी शास्त्र कुठून आणले, आदी मुद्यांचा तपास करायचा असल्यामुळे त्यांचा पीसीआर मिळावा अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला.दुसरी अशीच घटना शनिवारी रात्री हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उदयनगर चौकाजवळ घडली होती.कार पार्किंगच्या वादातून आरोपी बादल नेताम, नीलेश गेडाम, रोशन धुर्वे आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चेतन मेटांगळे या तरुणाची निर्घृण हत्या केली होती. हुडकेश्­वर पोलिसांनी आरोपी नेताम, गेडाम आणि धुर्वे या तिघांना न्यायालयात हजर करून त्यांचा २३ ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळवला. तर, अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक