शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी दिला कारने धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:02 IST

एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले.

ठळक मुद्देगोहणीतील प्रकार घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. दुसरीकडे या घटनेवरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींनी पोलीस अधिकाऱ्याला धक्का दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे कळमेश्वर पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोहणी येथे शेती खरेदीवरून वाद सुरू आहे. राजेश यादव (५०, रा. के.जी.एन. सोसायटी, फ्रेन्डस् कॉलनी, नागपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी फैज अजीज नफिक सिद्दीकी (३८, रा. बोरगाव) याच्याकडील गोहणी शिवारातील तीन एकर शेती घेण्याचा सौदा करून विक्री करून घेतली. मात्र फैजने जास्त पैशाची मागणी केल्याने राजेशसमोर पेच निर्माण झाला होता. त्यातूनच फैजने शेतीचा कब्जा देण्यास मज्जाव केला होता. शेतीवर काही तरुणांना तैनातही केले होते. या प्रकरणात राजेशने कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्या तक्रारीवरून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ढुमे हे पोलीस पथकासह गोहणी येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. घटनास्थळी काही तरुण हे स्विफ्ट कारमध्ये असल्याचे दिसले. ढुमे हे कारपर्यंत जाऊन चावी काढण्याच्या प्रयत्नात होते. तर आरोपी हे कारमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात कारचे दार उघडत असताना ढुमे पाटील यांना कारचा धक्का लागला आणि पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले.याबाबत कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधला असता अशी काही घटनाच घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनीही घटनेत काही तथ्य नसल्याचे सांगितले. दुसरीकडे सदर घटना ही खरी असून पोलीस मात्र ते का बरे लपवित आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आरोपींनी दिल्या पोलिसांच्या हातावर तुरीया घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. घटनास्थळी आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले होते. आरोपींना पकडणार तेवढ्यात कारमधून आरोपी पळण्याच्या प्रयत्नात होते.ही बाब परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या निदर्शनास येताच ते कारच्या दिशेने गेले. कारची चावी काढून आरोपींना पकडण्याची तयारी करीत असताना आरोपींनी जबर धक्का देत कारने पळाले. पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी हे घटनास्थळाहून पसार झाले. ही बाजू असताना पोलीस मात्र घटनेला ‘सौम्य’ सांगत आहे. या प्रकरणात आणखी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

प्रकरण रंगविले जात आहे - पोलीस अधीक्षकदरम्यान नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क केला असता, ‘आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना थांबवित असताना कारचा हलकासा धक्का ढुमे यांना लागला. हे प्रकरण सोशल मीडियावर रंगविले जात आहे. त्यात काही सत्यता नाही’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस