शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पिन्नू पांडे फायरिंग प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:57 IST

कुख्यात गुंड सुमित ठाकूर याचा साथीदार आणि गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड पिन्नू पांडे याच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपात मोक्का लावण्यात आल्यानंतर फरार झालेला गुंड दिशान ऊर्फ जेडे खान गुलशेर खान याला जरीपटका पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या अटक केली.

ठळक मुद्देकुख्यात सुमित ठाकूरचा साथीदार : सहा महिन्यापासून होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड सुमित ठाकूर याचा साथीदार आणि गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड पिन्नू पांडे याच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपात मोक्का लावण्यात आल्यानंतर फरार झालेला गुंड दिशान ऊर्फ जेडे खान गुलशेर खान याला जरीपटका पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या अटक केली.कुख्यात सुमित ठाकूर याच्या टोळीचा सदस्य असलेला जेडे खान खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाकूर टोळीचा प्रतिस्पर्धी गुंड पिन्नू पांडे याचा गेम करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी कुख्यात सुमितने कट रचला होता. त्यानुसार, आपल्या साथीदारांकडून त्याच्यावर सुमितने गोळ्या चालवल्या. मात्र, शूटरचा नेम चुकल्याने गोळी पायाला लागली. त्यामुळे पांडे बचावला. या गुन्ह्यात गिट्टीखदान पोलिसांनी सुमित ठाकूर टोळीच्या गुंडांना अटक केल्यानंतर या टोळीविरुद्ध मोक्का लावला. सुमितचा शोध घेत त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी अटक केली. या गुन्ह्यात जेडेचाही समावेश होता. मात्र, तो फरार झाला. गिट्टीखदान पोलीस, गुन्हे शाखा तसेच ठिकठिकाणचे पोलीस जेडेचा शोध घेत होते. तो जरीपटक्यातील वेकोलिच्या इमारतीजवळ घुटमळत असल्याची माहिती जरीपटक्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चप्पे आणि नायक रोशन तिवारी यांना शनिवारी सायंकाळी ६.३० ला कळली. त्यांनी ही माहिती ठाणेदार पराग पोटे यांना देऊन लगेच आपल्या साथीदारांसह तिकडे धाव घेतली. पोलिसांची कुणकुण लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या जेडे खानच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

टॅग्स :FiringगोळीबारArrestअटक