शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या धाव चाचणीत टायमिंग, मार्क न सांगितल्याचा आरोप; पालकांनी घातला गोंधळ

By दयानंद पाईकराव | Updated: February 22, 2024 15:38 IST

वन अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर झाले शांत

नागपूर : वन विभागाच्या मिहान परिसरात सुरु असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला. परंतु ही भरती प्रक्रीया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले.

वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी २१ फेब्रुवारी २०२४ पासून मौजा कलकुही, लुपिन चौक, मिहान येथे घेण्यात येत आहे. गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला. ३ किलोमिटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजुत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर पालक शांत झाले.

भरती प्रक्रिया पारदर्शक‘वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. यात सर्व प्रक्रीया आॅनलाईन असल्यामुळे कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही. सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात येत आहेत. परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही. आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब समजुन सांगितल्यानंतर ते शांत झाले.’ -डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर