शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील १८ लाखांच्या घरफोडीच्या आरोपीला नागपुरात अटक

By योगेश पांडे | Updated: February 6, 2025 15:43 IST

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भंडाऱ्यातील १८ लाखांच्या घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याला संशयावरून थांबविले व झडतीत त्याच्याकडे रोख रक्कम व दागिने आढळल्याले हा प्रकार समोर आला. त्याने लग्नकार्यासाठी असलेल्या रकमेवर डल्ला मारला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

रोशन सेवकदास मेश्राम (४१, भीमटेकडी, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी त्याने भंडारा येथे महेश सुरेश मंत्री (४१, शास्त्रीनगर, गुरुनानक वॉर्ड) यांच्या घराचे कुलूप तोडून १८ लाखांची रोख व दागिने लंपास केले होते. हा मुद्देमाल मंत्री यांच्याघरील लग्नाचा होता. भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. बुधवारी साडेचार वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गिट्टीखदान येथील आयबीएम मार्गावर मोपेडवरून जात असताना पोलिसांनी मेश्रामला संशयावरून थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणावर रोकड व दागिने आढळले. त्याला पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्याने भंडारा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ८.६८ लाखांची रोख रक्कम व ७.७१ लाखांचे दागिने तसेच मोबाईल, दुचाकी असा १७.४४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मेश्रामला भंडारा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी