शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेजारी तरुणच निघाला आरोपी

By admin | Updated: July 23, 2016 03:08 IST

कराटे खेळाडू असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी तिचाच शेजारी निघाला.

इमामवाडा येथील घटना : मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा शोध लागला नागपूर : कराटे खेळाडू असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी तिचाच शेजारी निघाला. गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री छडा लावत हे प्रकरण सोडविले. पोलिसांनी आरोपी सोनू गुप्ता (२५) याला ताब्यात घेतले आहे. रामबाग येथील सोनू अनिल गुप्ता याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा छेडखानीचे दोन गुन्हे दाखल आहेत. २१ जुलै रोजी रात्री १२ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून मेडिकलच्या टी.बी. वॉर्ड परिसरातील बेवारस क्वॉर्टरमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. तेव्हापासून नागरिक संतप्त होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पीडित मुलीकडून आरोपीबाबत मिळालेली माहिती आणि घटनास्थळ पाहता आरोपी परिसरातीलच असल्याचा पोलिसांना संशय होताच. त्यानुसार इमामवाडा परिसरातील संशयितांची धरपकड केली जात होती. शुक्रवारी सकाळी पोलीस रामबाग येथील संशयिताचा बायोडाटा पाहत होते. मुलीने केलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार पोलिसांची सोनूवर नजर गेली. तो महिलांची छेडखानी करण्यासाठी परिसरात ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे सुद्धा दाखल आहेत. तो अचानक गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला पकडले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. मिळालेल्या माहितीनुसार सोनू पीडित मुलीच्या बहिणीला ओळखत होता. पीडित मुलीची नजर थोडी कमजोर आहे. याबाबत सोनूला माहीत असल्याचा संशय आहे. सोनू ये-जा करीत असलेला रस्ता त्याला माहीत होता. त्याने २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीला मेडिकल चौकात रोखले. तिच्या बहिणीचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच तिची बहीण व तो मुलगा कुठे भेटतात ती जागा तिला दाखवण्याची तयारी दर्शविली. परंतु सोनूसोबत न जाता घरी परत आली. काही वेळानंतर ती करटे क्लासला निघून गेली. तेथून परत येत असतांना सोनुने पुन्हा तिला रोखले. तसेच ती जागा दाखवण्याच्या बहाण्याने तिला सोबत नेले. तो तिला घेऊन टीबी वॉर्ड परिसरातील बेवारस क्वॉर्टरमध्ये घेऊन गेला. तसेच तिला त्या क्वॉर्टरमध्ये लपून बसण्यास सांगितले. त्यानंतर तो बाहेर आला आणि कुणालातरी फोन केला. नंतर मुलीवर बळजबरी करू लागला. पीडित मुलीने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला लाथ मारून खाली पाडले. दगडही फेकून मारला. यामुळे आरोपीने मुलीला मारहाण केली. तिचे डोकेही फोडले. (प्रतिनिधी)