शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपीला पकडले

By admin | Updated: April 2, 2015 02:34 IST

कन्हान येथील रेतीमाफियांच्या गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या आरोपीस कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले.

कामठी : कन्हान येथील रेतीमाफियांच्या गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या आरोपीस कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरोपीने तेथून पलायन केले होते. त्या आरोपीस कन्हान, कामठी व गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने केवळ आठ तासात नागपुरातून ताब्यात घेतले. कन्हान शहरात २४ मार्चला रेतीमाफियांच्या दोन गटात तणाव व गोळीबार झाला होता. गोळीबारात जखमी झालेला कमलेश हरिचंद मेश्राम (३०) व तेजराम गोपाल मुळे (२५) या दोघांना कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले होते. तेथे दोघांवरही शस्त्रक्रिया झाली होती. उपचार सुरू असतानाच कमलेश हरिचंद मेश्राम याने मंगळवारी दुपारी हॉस्पिटलमधून पलायन केले. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंत्तेवार, कन्हानचे ठाणेदार सुभाष माकोडे, अजयकुमार मालवीय, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी विविध विशेष पथक रवाना केले.दरम्यान, आरोपी कमलेश मेश्राम नागपुरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भांडारकर, ठाणेदार सुभाष माकोडे, सहायक पोलीस निरीक्षक अजय कामळे यांच्या पथकाने सापळा रचून अवघ्या आठ तासांत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस मंगळवारी रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)