शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यातून आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 23:50 IST

१५ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक आरोपी तपास अधिकाऱ्याच्या निगराणीतून फरार झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यात घडली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वस्तीतील १५ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक आरोपी तपास अधिकाऱ्याच्या निगराणीतून फरार झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यात घडली आहे. यामुळे अजनी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.दीपांशू विरुळकर (२०) रा. सावरबांधे सभागृहाजवळ, हुडकेश्वर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरला अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय मुलगी शाळेत गेली होती. दीपांशूने मुलीच्या आजीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिला शाळेतून सोबत नेऊन तिचे अपहरण केले. दोन दिवस होऊनही मुलगी घरी न आल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी ११ सप्टेंबरला अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीला घेऊन दीपांशू गुजरातला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ते नाशिक, पुणे, मुंबईत राहिले. ६ ऑक्टोबरला ते नागपुरात आले. रविवारी रात्री ते कोराडी मंदिरात दर्शनासाठी गेले असता अजनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. दीपांशूला पोलीस कोठडीत ठेवून मुलीला कुटुंबीयांसोबत घरी पाठविले. सोमवारी दुपारी तपास अधिकारी सहायक उपनिरीक्षक डेहनकर यांनी दीपांशूला चौकशीसाठी बाहेर काढले असता चौकशी सुरू असताना दुपारी ४.४५ वाजता लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने दीपांशू फरार झाला. त्याचा शोध घेऊनही तो कुठेच आढळला नाही. आरोपी फरार झाल्यानंतर अजनी पोलीस आरोपीला अटकच केली नसल्याचे सांगत असून त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती देत आहेत. दोन महिन्यापूर्वीही अजनी पोलीस कोठडीतून आरोपी पळून गेला होता.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेnagpurनागपूर