उमरेड : अचानक जनावरे समाेर आल्याने भरधाव दुचाकी स्लिप झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव (मुंगलाई) परिसरात नुकतीच घडली. असलम गाैसू अगवान शेख (३४, रा. सिर्सी, ता. उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. असलम शेख हा आपल्या एमएच ४० ए ७५०९ क्रमांकाच्या दुचाकीने सिर्सीकडून उमरेडला जात हाेता. दरम्यान, चारगाव (मुंगलाई) परिसरातील वळण मार्गावर अचानक त्याच्या दुचाकीसमाेर जनावरे आल्याने त्याची दुचाकी स्लिप झाली व ताे राेडवर पडून गंभीर जखमी झाला. लगेच त्याला उमरेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १० एप्रिल राेजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेडिकल पाेलीस बुथच्या सूचनेवरून उमरेड पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, पाेलीस नाईक राहुल धाेंडे तपास करीत आहेत.
तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST