शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 23, 2016 03:24 IST

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले.

दुचाकी दुभाजकावर आदळली : सावळी शिवारातील घटना मौदा : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. त्यातच भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. तिघेही गोंदिया येथील रहिवासी आहेत. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - भंडारा महामार्गावरील सावळी (फाटा) शिवारात गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश ख्रिश्चंद्र गौतम (२३, रा. सूर्यटोला, गोंदिया), आकाश धनलाल गौतम (२४, रा. सूर्यटोला, गोंदिया) व अमित पवन दाणी (२३, रा. गोशाला वॉर्ड, गोंदिया) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही मोटरसायकलने गोंदियाहून नागपूरला जात होते. ते सावळी (फाटा) शिवारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे तिघेही खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत रोडवर पडून असल्याने तसेच त्यांना वेळीच कुणीही मदत न केल्याने मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यात तिघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळाने या घटनेची माहिती पोलिसंना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांचाही मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मोटरसायकल निष्काळजीपणाने चालविल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७२, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे व मेश्राम करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)