शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

मानकापूर उड्डाण पूल झाला ‘अ‍ॅक्सिडेंट स्पॉट’

By admin | Updated: February 6, 2015 00:59 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.मानकापूर उड्डाण पूल दोन भागात बांधण्यात आला आहे. मानकापूर चौक झिंगाबाई टाकळी फरस चौकपर्यंत पहिला पूल व झिंगाबाई टाकळी ते कोराडी रोडवरील रेल्वे लाईन ओलांडणारा दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पुलावरून कोराडीकडून येणारी वाहने तसेच मानकापूरकडून कोराडीकडे जाणारी वाहने टाकळी फरस चौकात उतरतात. पुलावरून ही वाहने भरधाव येतात. विशेष म्हणजे या चौकातून एक रस्ता पश्चिमेकडे झिंगाबाई टाकळीकडे जातो तर दुसरा रस्ता पूर्वेकडील वस्त्यांमध्ये जातो. टाकळीतून पुलावर चढणारी वाहने व पुलावरून दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने येणारी वाहने यात धडक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे अपघातही घडले आहेत. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी डिव्हायडर लावून पूर्व व पश्चिमेकडून पुलावर चढणारी वाहने बंद केली होती. त्यामुळे समोर पुलाखाली असलेल्या बोगद्यातून वाहने न्यावी लागत होती. यात लहान गाड्यांची अडचण नव्हती. पण स्टार बस, ट्रक ही वाहने बोगद्यातून नेण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी स्टार बस प्रशासनाने या मार्गावरील स्टार बस बंद केली होती. शेवटी नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत पोलिसांनी डिव्हायडर हटविले. वाहतूक सुरू झाली पण धोका मात्र कायम आहे. या दोन्ही पुलाच्या मधील टाकळी फरस चौकात सिग्नल लावावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक चंद्रशेखर यांची भेट घेत सिग्नल लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी चंद्रशेखर यांनी महापालिकेला पत्र देत सिग्नल लावण्याची सूचना केली. महापालिकेने या पत्रावर सिग्नल लावण्याची मंजुरी दिली. प्रस्ताव तयार केला पण आपल्याकडे निधी नाही नसल्याचे सांगत महामार्ग प्राधिकरणाने यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. आजवर सिग्नल लावण्यासाठी निधी कोण देणार हे स्पष्ट झालेले नाही. एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात वसंतराव मोथे, डॉ. मधुसूदन मैंद, संजय मैंद, सुनील पाली, युवराज चौरसिया, प्रशांत चौधरी, अमर खोडे, उकुंडराव राऊत, अ‍ॅड. राजू ढोबळे, सुनील चौधरी, सुरेश मोथे आदींच्या शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मिश्रा यांची भेट घेऊन लिग्नल लावण्याचे निवेदन दिले. आ. सुधाकर देशमुख यांचीही भेट घेतली. आमदार व प्रकल्प संचालक दोघांनीही प्रत्यक्ष मोक्कापाहणी करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्ती कधी होईल, सिग्नल कधी लागतील व धोका कधी टळेल याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. सिग्लचे काम त्वरित न झाल्यास रस्ता रोका करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)