शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात; पाच ठार १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:25 IST

नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर मागून धडकली.

ठळक मुद्देबंद असलेल्या ट्रकवर आदळली ट्रॅव्हल्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर मागून धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह एका महिलेचा समावेश आहे. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.मृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. हे सर्व जण नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे जाणाऱ्या एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाचा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. दुसरीकडे, उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व सर्व जखमींला लगेच उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात