शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या ...

ठळक मुद्देशेखर चरेगांवकर : सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा सहकार क्षेत्राने सकारात्मक दृष्टीने स्वीकार करावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी येथे व्यक्त केले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर आणि सहकार भारती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकारी परिषदेचे आयोजन गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, समृद्धी सहकारी बँक लि. नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संस्था मर्या.नागपूरचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था, नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, सहकारी संस्था नागपूरचे जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, सहकार भारती विदर्भचे प्रकोष्ठ प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते.सहकार चळवळीलागतवैभव प्राप्त व्हावेचरेगावकर म्हणाले, ९७ व्या घटनादुरुस्तीत सहकाराला स्वायत्तता द्या, व्यावसायिकता आणा आणि लोकशाहीने नियंत्रण आणण्याचा सूचना केल्या आहेत. जे सभासद प्रश्न विचारतात ते विरोधक होतात. तर दुसरीकडे सभासद पतसंस्थेचे मालक आहेत, असे अध्यक्ष सांगतात. हा विरोधाभास आहे. समाजाचा सहकारावर विश्वास आहे. सभासद व संचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संगणक साक्षरता विभाग बनवावा लागेल. राज्यातील १७ हजार पतसंस्थांमध्ये लोकांच्या ५९ हजार कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी संस्थांचा नफा सभासदांमध्ये वाटला जातो. पण पतसंस्था, दूध डेअरी असो वा साखर कारखाने, यांचे वय वाढल्यामुळे आजार जडले. सहकार चळवळ समाजाचा विश्वास संपादन करण्यास कमी पडली. नागरी बँकांचे विश्वस्त न राहता मालक झाले आणि बँकांना गालबोट लागले. मोठे उद्योजक समाजाच्या पैशावर खासगी उद्योग चालवितात. मग सहकार चळवळ का नाही? असा सवाल करीत त्यांनी सहकार चळवळीतील मरगळ दूर करून गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.कांचन गडकरी यांनी महिला बचत गटांना सक्षम करून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याचे आवाहन केले. महिलांचा सहकारात सहभाग कसा राहील, यावर त्यांनी भाष्य केले.संचालन सहकार भारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले तर सहकार भारती नागपूरचे अध्यक्ष भरत महाशब्दे यांनी आभार मानले. समापन मंत्र अंजली मुळे यांनी म्हटला.परिषदेत नागपुरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.