शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एसीबी’ची कारवाई :लाचखाेर महसूल सहायकासह मदतनीस अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 22:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : वडिलाेपार्जित शेती अकृषक करण्यासाठी शेतकऱ्याला ६० हजार रुपयाची लाग मागणाऱ्या महसूल सहायक व त्याच्या ...

ठळक मुद्देअकृषक जमिनीसाठी मागितली ६० हजाराची लाच

लाेकमत न्यूज नेटवर्कसावनेर : वडिलाेपार्जित शेती अकृषक करण्यासाठी शेतकऱ्याला ६० हजार रुपयाची लाग मागणाऱ्या महसूल सहायक व त्याच्या खासगी मदतनिसाला ५५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सावनेर तहसील कार्यालयात साेमवारी (दि. १४) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राजेंद्र जीवन उबाळे (५२) व शुभम सुभाष साबळे (२३), अशी अटक करण्यात आलेल्या लाचखाेर आराेपींची नावे आहेत. राजेंद्र उबाळे हा सावनेर तहसील कार्यालयात महसूल सहायक म्हणून नाेकरी करीत असून, शुभम त्याचा मदतनीस म्हणून काम करताे. तक्रारकर्ते बाबा फरीदनगर, नागपूर येथील रहिवासी असून, त्यांची कवडस (ता. सावनेर) येथे ०.५६ हेक्टर वडिलाेपार्जित शेती आहे. यातील ०.१० हेक्टर शेती अकृषक (एनए) करण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडे रीतसर अर्ज केला हाेता. त्या अर्जावर कार्यवाहीला सुरुवातही करण्यात आली. मात्र, शुभम साबळे याने राजेंद्र उबाळे याच्या सांगण्यावरून तक्रारकर्त्यास भेटला आणि त्यांना या कामासाठी ६० हजार रुपयाची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.पुढे तडजाेडीअंती हा साैदा ५५ हजार रुपयावर आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यानी ही रक्कम साेमवारी दुपारी सावनेर तहसील कार्यालयात शुभमच्या सुपूर्द केली. त्याचवेळी कार्यालय परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुभमला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही लाच राजेंद्र उबाळे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे सांगितल्याने या पथकाने राजेंद्र उबाळेलाही अटक केली.

याप्रकरणी सावनेर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पाेलीस उपअधीक्षक संदीप जगताप, हवालदार प्रवीण पडाेळे, मंगेश कळंबे, पंकज घाेडके, अनिल बहिरे, हरीश गांजरे, दीपाली भगत, सदानंद सिरसाट यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण