शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे२०२०-२१ चे शैक्षणिक कॅलेंडर घोषितहिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरपासून, सत्रावर ‘कोरोना’चे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान यास्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर हिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्याचा विद्यापीठाचा मानस असून, २०२१ च्या उन्हाळी परीक्षा या २२ मार्चपासून सुरू होतील. विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होते. यंदा मात्र १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीची भरपाई विद्यापीठाच्या दिवाळी, हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून करण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्या एक महिन्याऐवजी एकाच आठवड्याच्या असतील. तर हिवाळी सुट्या २० दिवसांच्या व उन्हाळी सुट्या एका महिन्याच्या असतील. विषम सत्राच्या नियमित परीक्षा या १२ डिसेंबर रोजी सुरू होतील. उन्हाळ्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मार्च रोजी तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हानसत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमानुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली किंवा विद्यार्थी उशिरा आले तर सत्र कसे पूर्ण होणार, हादेखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागात ‘आॅऑनलाईन’ वर्ग घेण्यास अडचणी येऊ शकतात.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ