शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फरार बिल्डर पितापुत्र मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:11 IST

सात जणांच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपावरून जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेले बिल्डर पितापुत्र नागपुरातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्यांच्या दारुड्या वाहनचालकामुळे शनिवारी मध्यरात्री त्यांचा छडा लागला. महेश खेमतानी आणि आशिष खेमतानी अशी या दोघांची नावे आहेत. लकडगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देनागपुरात बसले होते दडूनदारुड्या वाहनचालकाकडून लागला छडा लकडगंज पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात जणांच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपावरून जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेले बिल्डर पितापुत्र नागपुरातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्यांच्या दारुड्या वाहनचालकामुळे शनिवारी मध्यरात्री त्यांचा छडा लागला. महेश खेमतानी आणि आशिष खेमतानी अशी या दोघांची नावे आहेत. लकडगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले.पोलिसांच्या माहितीनुसार, खेमतानी पितापुत्र जबलपूरमधील मोठे बिल्डर आहे. त्यानी काही दिवसांपूर्वी बांधलेली १० माळ्याची इमारत निकृष्ट बांधकामामुळे जमीनदोस्त झाली. इमारतीच्या मलब्यात दबून सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी महेश खेमतानी आणि त्याचा मुलगा आशिष या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ते जबलपुरातून फरार झाले. ते नागपुरात येऊन सोमलवाड्यातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्याची कुणाला कुणकुण नव्हती. त्यांच्या सेवेत त्यांचा कारचालक निर्मलसिंग मनजीतसिंग होता. दारूच्या नशेत टुन्न होऊन शनिवारी रात्री ११ च्या सुमारास निर्मलसिंग गंगाजमुना परिसरातून एसक्रॉस कारने (एमपी २०/ डब्ल्यूए १३४५) वेगाने जात होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला रोखले. त्याच्या तोंडून उग्र दर्प येत असल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथअ‍ॅनालायझरने तपासणी केली. तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने ही कार जबलपूरमधील फरार बिल्डर खेमतानीची असून, आपण त्या पितापुत्राच्या सेवेत असल्याचे सांगितले. फरार बिल्डर वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये दडून असल्याचीही माहिती त्याने दिली.जबलपूर पोलीस नागपुरातही माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांना कळविली. त्यानुसार, लकडगंज पोलिसांचे पथक मध्यरात्री बिल्डर पितापुत्राला ताब्यात घेण्यासाठी हॉटेलकडे रवाना झाले. त्यांनी खेमतानीला ताब्यात घेतल्यानंतर जबलपूर पोलिसांना कळविले. जबलपूर पोलिसांचे पथक पहाटे नागपुरात पोहचले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले अन् जबलपूरकडे हे पथक रवाना झाले.

 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक