शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी एक लाखामागे ८५ कॅन्सरचे रुग्ण

By admin | Updated: June 16, 2017 02:12 IST

नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या मागे दरवर्षी ८५ नव्या कॅन्सर रुग्णांची भर पडत आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक : ‘हेड अ‍ॅण्ड नेक’चे सर्वाधिक रुग्णलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या मागे दरवर्षी ८५ नव्या कॅन्सर रुग्णांची भर पडत आहे. तर भारतातील मिझोराम येथे हेच प्रमाण २०४ आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज चौधरी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी हॉस्पिटलचे संयुक्त संचालक डॉ. बी. के. शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. सत्यशिल सप्रे, डॉ. करतार सिंग, डॉ. महेश क्रिपलानी आदी उपस्थित होते.मुखकर्करोगाचे १५.७ टक्के रुग्णडॉ. चौधरी म्हणाले, नागपुरात एक लाख लोकसंख्येमध्ये १५.७ टक्के मुखकर्करोगाचे पुरुष रुग्ण आढळून येतात, तर जीभेच्या कर्करोगाचे ८ टक्के रुग्ण आढळतात. महिलांमध्ये मुखकर्करोगाची टक्केवारी ५.१ आहे. परंतु गर्भाशायाच्या कर्करोगाचे प्रमाण १३.५ टक्के आहे तर अंडाशय कर्करोगाचे प्रमाण ६.३ टक्के आहे. रविवारी ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर रिसेन्ट अपडेट्स’राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल’ येथे ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर रिसेन्ट अपडेट्स’वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कॅन्सरवरील शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, मेडिकल आॅन्कोलॉजी आणि इम्युनोथेरपी यांच्यासह वेदना प्रबंधन, पॅलिलेशन या विषयावर भारतातील ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सोबतच वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञांसाठी ‘अ‍ॅडव्हान्स रेडिओथेरपी टेक्निक्स इन हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’वर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. ५० टक्के कॅन्सरला तंबाखू कारणीभूत५० टक्के कॅन्सरला तंबाखू हे कारणीभूत ठरते. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे. विशेष म्हणजे मेघालयमध्ये तंबाखूशी संबंधित कॅन्सरच्या पुरुष रुग्णांची संख्या ६९.५ टक्के आहे तर महिलांची संख्या ४५ टक्के आहे. कॅन्सर हॉस्पिटलची धक्कादायक आकडेवारी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २०१२ व २०१३ या दोन वर्षांत २५२१ पुरुष तर २५३५ कॅन्सर रुग्णांनी उपचार घेतला. यातील तंबाखूमुळे झालेल्या कर्करोगाची टक्केवारी धक्कादायक आहे. तंबाखूमुळे तब्बल ६० टक्के पुरुष तर २२.६ टक्के महिलांना कॅन्सर झाल्याची नोंद आहे. यात पुरुषांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण २०.९ टक्के, जीभेच्या कर्करोगाचे प्रमाण ९.६ टक्के तर ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण ०.९ टक्के असे एकूण ३१.४ टक्के आहे. तर महिलांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ८.१ टक्के, जीभेचा कर्करोगाचे प्रमाण ३.४ टक्के तर ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण ०.३ टक्के आहे, असे एकूण ११.८ टक्के आहे.