मालमत्ता करावरील १.८० कोटीचा दंड माफ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्याची तरतूद केली आहे. सुरुवातीच्या १३ दिवसात ५,३४२ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, १.८० कोटीचा दंड माफ करण्यात आला. दंड माफ करण्यात मंगळवारी झोन सर्वात आघाडीवर आहे. ७७४ थकबाकीदारांनी १.१२ कोटी मनपा तिजोरीत जमा केले, तर संबंधितांना ३४.२१ लाख दंड माफ केला. संख्येचा विचार करता आसीनगर झोन सर्वात आघाडीवर आहे. येथील ८२३ थकबाकीदारांनी ७२ लाख मनपा तिजोरीत जमा केले, तर २८.९५ दंड माफ करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यात धंतोली झोन सर्वात मागे आहे. येथील १६४ थकबाकीदारांनी मनपाकडे २९.८४ लाख जमा केले असून, ४.७१ लाख दंड माफ झाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांचा प्रतिसाद वाढत असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली. योजनेबाबत जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत ५ हजार ३४२ मालमत्ताधारकांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.
...........
झोन लाभार्थी जमा रक्कम दंड माफ
लक्ष्मीनगर ५७८ ६५.७१ लाख १९.५२ लाख
धरमपेठ ३७१ ५२,७६ लाख १४ लाख
हनुमाननगर ५८१ ६४.३३ लाख २२ लाख
धंतोली १६४ २९.८४ लाख ४.७१ लाख
नेहरूनगर ६९५ ७०.७२ लाख १७.६८ लाख
गांधीबाग २३९ २९.२८ लाख ८.५७ लाख
सतरंजीपुरा ३६६ ३५ लाख १०.८४ लाख
लकडगंज ७५१ ७१ लाख १९.७८ लाख
आसीनगर ८२३ ७२ लाख २८.९५ लाख
मंगळवारी ७७४ १.१२ कोटी ३४.२१ लाख