शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

अपहरण केलेली विद्यार्थिनी नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:35 IST

अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरुणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध देवलापार पोलिसांकडे सोपविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरुणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवारी रात्री देवलापार पोलिसांच्या ताब्यात दिले.कविता (बदललेले नाव) असे अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अल्पवयीन असून ११ व्या वर्गात शिकते. अपहरण करणारा आकाश हा २१ वर्षांचा असून त्याचे लग्न झाले आहे. कविता आणि आकाश यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आकाशने तिला फूस लावून पळविले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कविता तिच्या मैत्रिणीसोबत घरुन निघाली. ठरल्याप्रमाणे आकाश त्यांना भेटला. आकाश त्यांना घेऊन भंडाऱ्याला गेला. भंडाऱ्यावरून कविताची मैत्रिण घरी परतली. घडलेला प्रकार तिने कविताच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे कविताच्या कुटुंबीयांनी आकाशविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कविता अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. देवलापार पोलिसांनी लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रोशन खांडेकर यांना विद्यार्थिनी आणि अपहरण करणाऱ्या आरोपीची माहिती दिली. आकाश आणि कविता दोघेही गणेशपेठ बसस्थानकावर आले. तेथून पायी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अहमदाबादला जाण्यासाठी ते प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात बसले होते. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक घाडगे, शिपाई भास्कर पांडे, महिला पोलीस सातारकर यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यांना दोघेही प्लॅटफार्मवर आढळले. त्यांची चौकशी करून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. ते सापडल्याची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली. देवलापार पोलीस आल्यानंतर या दोघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर