शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

नागपुरातील मानकापुरात बेदरकार कंटेनरचा थरार, डझनाहून अधिक वाहने चिरडली

By योगेश पांडे | Updated: April 8, 2024 00:14 IST

१८ हून अधिक जण जखमी, अनेक कारचा चेंदामेंदा : वाहतुक खोळंबली, घटनास्थळावर तणाव

योगेश पांडे नागपूर : मानकापूर चौकात रविवारी रात्री बेदरकार कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होतील की अनेक कारचा चेंदामेंदा झाला व एक कार तर थेट दुसऱ्या कारवरच चढली. या अपघातात १५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते.

एमएच ३४ एबी ७८८१ या कंटेनरमुळे हा भीषण अपघात झाला. मानकापूर उड्डाणपुलावरून संबंधित कंटेनर वेगाने आला. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि समोर लाल सिग्नल असल्याने थांबलेल्या वाहनांवर कंटेनर मागून धडकला. सर्वांसाठीच हा अपघात अनपेक्षित होता. अगोदर कंटेनरने एका कारला धडक दिली. त्यानंतर अक्षरश: काही कार व दुचाकी फरफटत गेल्या. एक कार दुसऱ्या कारवर चढली तर एक दुचाकी कंटेनरखाली चिरडल्या गेली. या अपघातात एका १०८ रुग्णवाहिकेलादेखील फटका बसला.

या रुग्णवाहिकेचाही चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर घटनास्थळावर किंकाळ्यांचाच आवाज होता. या अपघातात १८ हून अधिक जण जखमी झाले. घटनास्थळाजवळच दोन ते तीन इस्पितळे असल्याने अनेकांनी तिकडेच लगेच धाव घेतली. काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. मानकापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते का याचा तपास सुरू होता.

अनेक जण फ्रॅक्चर, वाहतुकीचा खोळंबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मध्यरात्रीपर्यंत तरी कुणाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र काही जणांना जोरदार मार लागला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकासह काही जण फ्रॅक्चरदेखील झाले आहेत. या अपघातानंतर संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ येत होते.

कारचा दरवाजा ओढून काढले बाहेर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार कारचे दरवाजेच या अपघातानंतर उघडत नव्हते. त्यांना घटनास्थळावरील नागरिकांनी कारचे दरवाजे ओढून बाहेर काढले. जबर जखमी असलेल्यांना लोक इस्पितळात घेऊन गेले. तर अनेक जण स्वत:च उपचारांसाठी दवाखान्यात गेले. ज्या कार्सचे नुकसान झाले, त्यातील बहुतांश कार नव्याच असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Accidentअपघातcarकार