शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी; विदर्भाच्या पंढरपुरात भक्तांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 10:32 IST

देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणांहून धापेवाडा येथे दिंडी व पालख्या दाखल झाल्या होत्या.

ठळक मुद्देधापेवाड्यात हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणांहून धापेवाडा येथे दिंडी व पालख्या दाखल झाल्या होत्या. विठ्ठल नामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. शिवाय, काही भाविकांनी चंद्रभागेत आंघोळ करून विठुरायाचे दर्शन घेतले.पहाटे ५ वाजता तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी धापेवाड्याचे सरपंच डॉ. मनोहर काळे, दिलीप धोटे यांच्यासह भाविक उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. शिवाय, ठिकठिकाणांहून दिंडी व पालख्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. ‘जय हरी विठ्ठल...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. सायंकाळपर्यंत अंदाजे एक लाख भक्तांनी विठुरायाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली. सायंकाळी संत कोलबास्वामी महाराज देवस्थान, संत रघुसंत महाराज मठ, संत मकरंदपुरी महाराज मठ, संत वारामाय मठ येथील दिंड्यांनी एकत्र येऊन नगरभ्रमण केले. येथे विठ्ठलाचे परमभक्त संत श्री कोलबास्वामी महाराज वास्तव्यास होते. त्यांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी येथे प्रगटले होते, असे भाविकांचे म्हणणे आहे. ज्यांना दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, ते धापेवाड्यात दर्शनासाठी येत असल्याचे अनेकांनी सांगितले.मंदिर परिसरात याात्रा भरली होती. भाविकांसाठी फराळ व चहाची व्यवस्था केली होती. शिवाय, वैद्यकीय सेवा व पिण्याच्या पाण्याचीही सोय केली होती.पोलीस बंदोबस्तासाठी सावनेर, कळमेश्वर, काटोल ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. भाविकांसाठी सावनेर, नागपूर, कळमेश्वर बसस्थानकाहून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी