शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ राज्यातील सर्व जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:01 IST

गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांच्या नियोजनाबाबत मंथन : शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.२ व ३ नोव्हेंबर ला ‘आप’चे महाराष्ट्र राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या नियोजनावर सखोल मंथन करण्यात आले. नेमक्या कुठल्या मतदारसंघात ‘आप’चे प्राबल्य आहे, तसेच मतांच्या गणितात ‘आप’ कसा बदल घडवून आणू शकेल यावर चर्चा झाली. राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रांसाठी संघटन प्रमुख नियुक्त करण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यात गाव व वॉर्ड स्तराची जबाबदारी निश्चित करण्याचादेखील निर्णय यावेळी झाला.बैठकीला ‘आप’चे राज्य संयोजक सुधीर सावंत, सहसंयोजक रंगा राचुरे, सचिव सुभाष तंवर, कोषाध्यक्ष जगजितसिंग, अजिंक्य शिंदे, उन्मेष बागवे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.गावित, अलीम पटेल, धनंजय शिंदे, किशोर मानध्यान, डॉ.देवेंद्र वानखडे, कविता सिंघल प्रामुख्याने उपस्थित होते.संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावाया बैठकीत शेतकरी समस्या व दुष्काळग्रस्त परिस्थितीवरदेखील चर्चा झाली. राज्य शासनाने सर्व राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षातर्फे व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.

टॅग्स :AAPआपElectionनिवडणूक