शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील  नरखेडला येणार आमिर खान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:05 IST

दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेत नरखेडातील ६६ गाव सहभागी : गावागावात स्पर्धेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ‘जलसंधारणातून मनसंधारण’ हे ब्रीद या स्पर्धेचे असून, सिने अभिनेता आमिर खान खुद्द या स्पर्धेत सहभागी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना प्रोत्साहित करतो. स्पर्धेतील गावकऱ्यांचा जोश बघता नरखेडातही आमिर खान येऊ शकतो.डिसेंबरपासून वॉटरकप स्पर्धेसाठी नरखेड तालुक्यात पाणी फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाने वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात नरखेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने, हा तालुका दुष्काळाच्या सावटात आला आहे. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमातून जलक्रांती व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. तालुक्यातील १५५ गावापैकी सुरुवातीला १०१ गावकऱ्यांनी सहमती दर्शविली. परंतु या स्पर्धेतील काही टप्पे काही गावांना पुर्ण करणे शक्य झाले नाही. अखेर या स्पर्धेसाठी ६६ गावांचे गावकरी पुढे आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या गावांनी स्पर्धेपुर्वीची सांडपाण्याचे शोष खड्डे, नर्सरी, आगपेटीमुक्त शिवार, माती परीक्षण ही कामे पुर्ण केली आहे. ८ एप्रिल ते २२ मार्च हा स्पर्धेचा कालावधी असून, गावकरी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. गावागावात बैठका, चर्चा, नियोजनाचे फड रंगत आहे. लहान थोराबरोबरच महिलाही या स्पर्धेत खांद्याला खांद्या लावून उतरल्या आहे. गावकऱ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, कृषी अधिकारी वर्ग २ पल्लवी तलमले सातत्याने गावकऱ्यांशी संपर्कात आहे. विशेष म्हणजे डॉ. बलकवडे यांना या प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात एकोपा निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून राज्याचे पहिले पारितोषिक पटकाविण्याचा मानस बनविला आहे.

टॅग्स :WaterपाणीSportsक्रीडा