विमानतळावर चाहत्यांची गर्दी नागपूर : पाणीसंकट आणि दुष्काळाच्या झळांमुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहेत. विविध पातळ्यांवर दुष्काळ निवारणासाठी उपाय केले जात आहेत. यात आता चित्रपट अभिनेता आमीर खान हा देखील जुळणार आहे. दुष्काळ निवारणाची मोहीम हाती घेऊन चित्रपट अभिनेता आमिर खान बुधवारी रात्री नागपुरात दाखल झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. आमीर खान गुरुवारी सकाळी ६.३० वाजता अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाला भेट देणार आहे.आमीर खानसोबत अभिनेत्री रिमा लागू, अनिल भटकल, सई ताम्हणकर, सुनील बर्वे हे देखील होते. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी निसर्गाची अवकृपा आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्रासून आत्महत्या केली आहे. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे संकेत आमीर खानने अगोदरच दिले होते. आता वरुड येथे पोहोचून यात प्रत्यक्ष सहभागी होणार आहे.(प्रतिनिधी)
दुष्काळ निवारणासाठी आमीर खान विदर्भात
By admin | Updated: May 5, 2016 02:57 IST