शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:44 IST

राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. यात नागपूर मेयो, मेडिकलमधील केवळ एकेक जणाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे२७ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांमधून केवळ १४३ जणांकडूनच वापर : मेयो, मेडिकलमधून केवळ एक व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीला घेऊन जुलै २०१७ मध्ये आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याचा सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) सर्वच मेडिकलला दिल्या. परंतु आता वर्ष होत असतानाही राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. यात नागपूर मेयो, मेडिकलमधील केवळ एकेक जणाचा समावेश आहे.कामावर असूनही दांडी मारणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रिक सक्तीचे करण्यात आले. परंतु त्यानंतरही दांडी मारणाऱ्यांची संख्या कमी झाली नव्हती. परिणामी, आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे राज्यस्तरावर यावर नजर ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मेडिकलच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याच्या सूचना केल्या.याच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळाही घेतली. यातून सर्वांना प्रशिक्षण व माहिती देण्यात आली. काही ठिकाणी नव्या मशीन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या. सूत्रानुसार, शासकीय रुग्णालयांमध्ये आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. परंतु त्यानंतरही राज्यभरातील मेडिकलमधील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले. यात नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये प्रत्येकी एक, आंबेजोगाई, चंद्रपूर व नांदेड मेडिकल येथून प्रत्येकी एक, पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज येथून १८८३, औरंगाबाद मेडिकल येथून ३२२, गोंदिया, सोलापूर व कोल्हापूर मेडिकल येथून प्रत्येकी २, अकोला मेडिकल येथून ७०३, लातूर मेडिकल येथून ७७५, सर जे.जे. हॉस्पिटलमधून १७ तर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून ४९५ आदींचा समावेश आहे. यातही केवळ १४३ बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याची माहिती ‘नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर’ने (एनआयसी) वैद्यकीय शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयासह इतर २० विषयांवर मे महिन्यात बैठक घेणार आहेत. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने सर्वांना आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याचा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर