शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या खरेदीची गुढी, बाजारपेठेत नवचैतन्य; सर्वच शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 9, 2024 21:00 IST

घर, वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री

नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत नवचैतन्य दिसून आले. अनेकांनी या मुहूर्ताचा योग साधत खरेदीला प्राधान्य दिल्याने सराफा मार्केट, बांधकाम व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, आणि दुचाकी व चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात गुढीपाडव्याच्या औचित्याने प्राथमिक अंदाजानुसार ५०० हून अधिक कोटींच्या आर्थिक उलाढालीची नोंद झाली. घराघरांतील मांगल्याच्या गुढीसोबत पाडव्यानिमित्त झालेल्या खरेदीची गुढीही उंचच राहिली. व्यापारी, व्यावसायिक आणि वितरकांनी दिलेल्या विविध ऑफर्समुळेही खरेदीचा उत्साह दुणावल्याचे चित्र बाजारपेठेत दिसले.

दरवाढीनंतरही सोने-चांदीची विक्री वाढलीसोने-चांदीचे दर वाढत असतानाही गुढीपाडव्याला ग्राहकांनी दौन्ही मौल्यवान धातूंची विविध स्वरूपात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नागपुरात ४० मोठ्या आणि २ हजारांहून अधिक मध्यम-लहान शोरूम असून सर्वच ठिकाणी गर्दी होती. सोन्याचे भाव जीएसटीसह ७५ हजारांवर गेल्यानंतरही ७५ ते १०० कोटींच्या उलाढालीचा अंदाज नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी व्यक्त केला. असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी यंदा गुढीपाडव्याला ग्राहकांनी सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल वाढली.

७०० चारचाकी व एक हजार दुचाकीची डिलेव्हरीगुढीपाडव्यानिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साह दिसून आला. दोन हजारांहून अधिक दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. गाडी घरी नेण्यासाठी ग्राहकांची सर्व शोरूममध्ये गर्दी होती. या दिवशी १५० कोटींच्या उलाढालीचा अंदाज आहे. अरूण मोटर्स प्रा.लि.चे करण पाटणी म्हणाले, गुढीपाडव्याला शोरूममधून २०० कारची डिलिव्हरी दिली. मारुतीच्या चार डीलर्सच्या माध्यमातून जवळपास ५०० कार विकल्या गेल्या. जयका मोटर्सचे महाव्यवस्थापक दीपलक्ष्मी खेडकर म्हणाले, जयका मोटर्सच्या नागपुरातील शोरूममधून १०० हून अधिक कारची डिलिव्हरी दिली. पाटणी बजाजचे नरेश पाटणी म्हणाले, ४० मोटरसायकल आणि १२० चेतक इलेक्ट्रिक स्कूटरेटची डिलिव्हरी देण्यात आली. मार्चमध्ये १५०० इलेक्ट्रिक स्कूटरेटची विक्री झाली होती. 

७०० ते ८०० फ्लॅटचे बुकिंगगुढीपाडव्याला नागपुरात ७०० ते ८०० फ्लॅटचे बुकिंग झाल्याची माहिती क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अगरवाला यांनी दिली. नागपुरात २ हजारांहून अधिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. विशेष ऑफर्स आणि विविध बँकांचे व्याजदर ८.२ ते ८.६ टक्क्यादरम्यान असल्याचा फायदा या क्षेत्राला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणीगुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारातदेखील एलईडी टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीनसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी चांगली गर्दी होती. मोबाईल आणि लॅपटॉप खरेदीसाठी युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर म्हणाले, यंदा नागपुरात जास्त किमतीच्या वस्तूंना मागणी होती. सर्वच कंपन्यांच्या वस्तू विकल्या गेल्या. टावरी मार्केटिंगचे संतोष टावरी म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्के जास्त उलाढाल झाली. शोरूममध्ये खरेदीसाठी गर्दी होती.