शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क कारमध्ये रचला दरोड्याचा कट, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:14 IST

मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक गस्तीवर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारमध्ये दरोड्याचा कट रचून शस्त्र घेऊन गुन्हा करण्यासाठी निघणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या वाहन चोरी व घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक गस्तीवर होते. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घोरपड गावाकडून शिरपुरकडे जाणाऱ्या मार्गाजवळील कालव्याजवळ सापळा रचून धाड टाकली. तेथे आशीष उर्फ मोनू किशोर मनपिया (२९, कांद्री, कन्हान), रजत दिलीप ननेट (२७, गौतमनगर, मेकोसाबाग), कार्तिक राम ननेट (२७, गौतमनगर, मेकोसाबाग), अब्दुल ताज उर्फ अब्दुल अजीज (३६, चित्तरंजन नगर, कामठी) यांना ताब्यात घेतले. त्यांचा रमाकांत नावाचा साथीदार फरार झाला.

आरोपींच्या ताब्यातून तीन चाकू, तलवार, मिरची पावडर, दोरी, चार मोबाईल आढळले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, अनिल इंगोले, दीपक रेठे, रवी अहीर, श्रीकांत उईके, प्रशांत गभने, प्रवीण रोडे, विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, राहुल कुसराम, सुधीर पवार, अभय ढोणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.