शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न; दैव बलवत्तर म्हणून बचावला, ७ सेकंदाचा थरार

By नरेश डोंगरे | Updated: April 6, 2024 21:31 IST

देवदुतांना बिलगुन व्यापारी सून्न पडून राहिला : आरपीएफचे 'ऑपरेशनचे जीवन रक्षा', काळाचा डाव परतला अन् धडधड करीत रेल्वेगाडी पुढे निघून गेली

नागपूर : हातात पाण्याची बाटली घेऊन धावत्या गाडीत चढण्याचा त्याने प्रयत्न केला. हे करताना स्वत:च्या जिवाशी तो खेळतो आहे, याचे त्याला भानच उरले नाही. मात्र, त्याचे नशिब बलवत्तर होते. त्यामुळे काळाचा डाव परतवला गेला अन् त्याचा जिव वाचला. धडधड करीत रेल्वेगाडी पुढे निघून गेली अन् देवदुतांना बिलगुन मध्य प्रदेशातील एक व्यापारी बराच वेळपर्यंत फलाटावर सून्न पडून राहिला. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर शुक्रवारी घडली.

कटंगी, बालाघाट (मध्य प्रदेश) येथील व्यापारी प्रकाश शिवल बुधे (वय ३९) शुक्रवारी व्यावसायिक कारणामुळे गोंदियात आले होते. काम आटोपल्यानंतर रात्री ते ट्रेन नंबर ०७८०७ गोंदिया-कटंगी पॅसेंजरने कटंगीकडे परत जात होते. गाडी फलाट क्रमांक १ वर उभी असताना ते फुड स्टॉलवर बराच वेळ उभे राहिले. गाडी सुटल्यानंतर हातात पाण्याची बाटली घेऊन धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागले. गाडीच्या दाराच्या हॅण्डलवरून त्यांचा ओला हात घसरला अन् गाडी तसेच फलाटाच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये बुधे येतात की काय अशी स्थिती निर्माण झाली. बुधे यांना काळ जवळ असल्याची चाहुल लागली आणि त्यांनी तशाच स्थितीत एका हाताने गाडीचा हॅण्डल धरून फलाटावर पायाच्या साह्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू केला. संभाव्य धोक्याची कल्पना येताच अनेकांनी डोळे मिटून घेतले. नेमके त्याचवेळी बुधे यांच्या मागे देवदुत बणून आलेल्या एका दुसऱ्या प्रवाशाने आणि समोर सुरक्षेसाठी उभे असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक एम. के. सक्सेना यांनी बुधे यांना घट्ट पकडून फलाटावर ओढून घेतले. काळाचा डाव परतवण्यात या दोघांना यश आले.

तिकडे धडधड करीत गाडी पुढे निघून गेली अन् ईकडे देवदुतांना घट्ट पकडून श्वास रोखत बराच वेळपर्यंत बुधे फलाटावर पडून राहिले. आजुबाजुच्या प्रवाशांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. प्रकाश बुधे यांचे बंधू मनोज बुधेही धावले. देवदूत बणून प्राण वाचविणाऱ्यांचे त्यांनी भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

सात सेकंदाचा घटनाक्रम, सोशल मिडियावर व्हायरलप्रकाश बुधे गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना खाली घसरल्याचा आणि त्यांना मृत्यूच्या जबड्यातून ओढून घेण्याचा हा घटनाक्रम केवळ सात क्षणांचा (रात्री ८:५४ ते ९:०१ वाजताचा) होता. देवदुतांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे बुधेंचा जीव वाचला. शनिवारी या घटनाक्रमाचा व्हीडीओ रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी प्रधान आरक्षक एम. के. सक्सेना यांचे प्रवाशाचा जीव वाचविल्याबद्दल काैतुक करून त्यांचा गाैरव केला.