शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 17:48 IST

Nagpur News समाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले.

ठळक मुद्देसावनेर-केळवद मार्गावरील अपघात

नागपूर: समाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. त्यामुळे बस राेडच्या खाली उतरली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. यात बस व कारमधील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर- केळवद मार्गावरील परसाेडी शिवारात शनिवारी (दि.५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

अभिकेत प्रभाकर लिचडे (२५, रा. राजीवनगर, सोमलवाडा, नागपूर), असे मृत कारचालकाचे नाव असून, जखमींमध्ये कारमधील निर्भय मेघराज चन्ने (२५), पीयूष विजय बांगडे (२५) व शुभम राजू ठाकरे (२५), तिघेही रा. सोमलवाडा, नागपूर यांच्यासह बसधील वासुदेव नत्थू श्रीरामे (७६, रा. भोलेनगर, हुडकेश्वर, नागपूर), सीताराम जयराम रेपाटे (७६, रा. हुडकेश्वर, नागपूर व दीपा चैतराम चौरे (३७, रा. वाॅर्ड क्रमांक-१, केळवद, ता. सावनेर) या तिघांचा समावेश आहे. त्या सहाही जणांना उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

अनिकेत व त्याच्या तीन मित्रांनी शनिवारी सकाळी जामसावळी, ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पूजा-आरती केली आणि एमएच-४०/सीएच-०११८ क्रमांकाच्या कारने ते केळवद, सावनेरमार्गे नागपूरला जायला निघाले. केळवद- सावनेरदरम्यानच्या परसाेडी (ता. सावनेर) शिवारात येताच अनिकेतने कारसमाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजे सावनेरहून केळवद येथे जाणारी एमएच-४०/एच-९९९२ क्रमांकाची बस जवळ येताच अनिकेतचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार बसवर धडकली.

धडक लागताच बस व कार राेडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून अनिकेतचा मृतदेह व जखमींना सावनेरात पाठविले. जखमींवर सावनेरातील शासकीय रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी पीयूष बांगडे यांच्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) गुन्हा दाखल केला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक कामटे करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिवावर उठले

सावनेर- केळवद- साैंसर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टाेल वसूल केला जाताे. पाच वर्षांपासून या राेडची दैन्यावस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी राेडवरील खड्ड्यांचा आकार व खाेली वाढत आहे. या राेडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे.

अर्धी बाजू बरी, अर्धी खराब

या राेडची एक बाजू बरी असून, दुसरी खराब आहे. खराब बाजूवरून वाहन चालविताना त्रास हाेत असल्याने चालक त्याचे वाहने दुसऱ्या बाजूने घेतात. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने अचानक वेगात वाहन आल्यास अपघात हाेतात. हा राेड आता समतल राहिला नाही. चालकाने बस आधी थांबविली असती, तर हा अपघात टळला असता.

टॅग्स :Accidentअपघात