शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 06:27 IST

नवी मूत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर हाेईल व ते अंतराळवीरांना पिण्यास वापरता येईल. 

- निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  :  ‘नासा’च्या माेहिमेत गेलेल्या सुनीता विल्यम्स १०० हून अधिक दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळवीर काय खात-पीत असतील, याचे सर्वांनाच कुतूहल आहे. स्पेस शटलमध्ये अन्न-पाण्याचा मुबलक साठा नेणे शक्य नाही. अशा स्थितीत अंतराळवीरांना पाणीपुरवठा करणारी ‘ब्रिफकेस’ व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली आहे. याद्वारे मानवी मूत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर हाेईल व ते अंतराळवीरांना पिण्यास वापरता येईल. 

कोणी केले संशोधन?nव्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डाॅ. श्रीराम साेनवणे यांच्या नेतृत्वात सुरतच्या एस. व्हीएनआयटीचे प्राध्यापक डाॅ. अलका मुंगरे व डाॅ. अरविंद मुंगरे यांनी ‘नॅनाे मेम्ब्रेन टेक्नॉलाॅजी’चा उपयाेग करून ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रियेने मानवी मुत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर करणारे तंत्र विकसित केले आहे. nअंतराळवीरांनी लघुशंका केली की ब्रिफकेसमध्ये ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रिया हाेऊन शुद्ध पाणी बाहेर पडेल. एक लिटर मूत्रातून ७०० मिली शुद्ध पाणी मिळेल.

पाणी पिण्यायाेग्य करण्याचे काम : डाॅ. साेनवणे यांच्या टीमचे समुद्राचे खारे पाणी कमी खर्चात पिण्यायाेग्य कसे करता येईल, यावर संशाेधन सुरू असून लवकरच त्याची घाेषणा हाेईल, असा विश्वास त्यांनी दिला.

उपयाेगी तंत्रज्ञानडाॅ. श्रीराम साेनवणे यांनी सांगितले, ‘नॅनाे मेम्ब्रेन टेक्नाॅलाॅजी’ बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालयात अत्यंत उपयाेगी पडणारी आहे. संशाेधकांनी हा प्रयाेग यशस्वी करून तसा प्रस्ताव दिला आहे.

शेतीसाठी खतया तंत्रज्ञानाने अमेरिकन मानकावर शुद्ध ठरलेले पाणी तर मिळेलच; पण त्यातून निघणाऱ्या वेस्टमधून शेतीत खतही मिळेल. पीएच-७.५, पीएच-८ व पीएच-९.५ असलेले फाॅस्फेट मिळते, जे शेतीसाठी उपयुक्त ठरते. 

टॅग्स :isroइस्रो