शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार

By सुमेध वाघमार | Updated: December 26, 2023 19:16 IST

आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.  

नागपूर : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणेला ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. खबरदारीचे आवाहन केले जात असताना मंगळवारी धरमपेठ येथील एका ६० वर्षीय रुग्णाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.  कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार (व्हेरियंट) ‘जेएन.१’ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन.१च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका असे एकूण १० रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात याचे किंचीत प्रमाण वाढत आहे. नागपुरच्या मनपा धरमपेठ झोनमधील रहिवासी ६० वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप व इतरही लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १० रुग्ण झाले असून ९ रुग्णांचे नमुने नव्या व्हेरियंटचे निदान करण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ला पाठविण्यात आले. लवकरच ६० वर्षीय रुग्णाचेही नमुने पाठविण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. -वृद्धांसाठी आठवड्यातून एकदा ‘बुस्टर डोस’मनपाच्या आरोग्य विभागाने ६० वर्षांवरील वृद्ध, ‘हेल्थ केअर वर्कर’ व ‘फ्रंट लाईन वर्कर’ यांचे दोन डोस झाल्यानंतर दिला जाणारा ‘बुस्टर डोस’ची व्यवस्था महाल येथील प्रभाकर दटके रोग निदान केंद्रात करण्यात आली आहे. मात्र आठवड्यातून एकच दिवस, शनिवारी ही सोय उपलब्ध असणार आहे. 

- घाबरू नका, काळजी घ्या -‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटची चर्चा आता होऊ लागली आहे. यामुळे घाबरून जावू नका, काळजी घ्या. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जायचेच असल्यास जाताना सुरक्षेची खबरदारी मास्क घाला. या शिवाय, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारा. लक्षणे दिसताच उपचार घ्या.-डॉ. जय देशमुख, वरीष्ठ फिजीशियन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर