शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

काळजावर दगड ठेवून आई-वडिलांनी निभावले कर्तव्य; १९ वर्षीय मुलाचे केले अवयवदान

By सुमेध वाघमार | Updated: September 5, 2023 19:04 IST

तिघांना मिळाले नवे जीवन 

नागपूर : अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या आपल्या १९ वर्षीय मुलाचा जाण्याचे दु:ख सहन करण्यापलिकडे होते. मात्र त्या दु:खातही त्यांनी समाजाप्रति आपले कर्तव्य निभावले. काळजावर दगड ठेवून मुलाचे अवयवदान केले. या मानवतावादी निर्णयाने मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्या तीन रुग्णांना नवे जीवन मिळाले.

प्रोसेस सर्व्हर सोसायटी, स्वावलंबी नगर, राणाप्रताप नगर येथील आर्यन आशिष जोशी (१९) त्या अवयवदात्याचे नाव. आर्यन हा आर्किटेक्चर ला प्रथम वषार्ला शिक्षण घेत होता. वडील एका दैनिकात वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. आई शिक्षिका आहेत. आर्यन हा मित्रांसोबत दुचाकीने बाहेर गेला होता. वर्धा रोडवरून जात असताना अचानक कारने मागून जोरदार धडक दिली. आर्यन गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. सलग तीन दिवस शर्थीच्या उपचारानंतरही तो प्रतिसाद देत नव्हता.

‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम, डॉ. ओम शुभम असई, डॉ. उदित नारंग, डॉ. वरिध कटियार या पथकाने आर्यनची तपासणी करून मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांच्यावर दु:खाचे आभाळच कोसळले.  एम्सचे ट्रान्सप्लांट समन्वयक प्रितम त्रिवेदी व प्राची खैरे यांनी आर्यनला अवयवरुपी जीवंत ठेवण्यासाठी अवयवदान करण्याचे कुटुंबियांचे समुपदेशन केले. त्या दु:खातही वडील आशिष व आई स्वाती जोशी यांनी अयवदानाला संमती दिली. याची माहिती माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, (झेडटीसीसी) नागपुरला देण्यात आली. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. 

-यकृत व दोन्ही किडनीचे दान‘आर्यन’चे दोन्ही किडनी व यकृताचे दान करण्यात आले. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाला, एक किडनी ‘एम्स’च्या ४४ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी एसएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ४३ वर्षीय महिलेला दान करण्यात आली. 

- ‘एम्स’मध्ये चौथे किडनी ट्रान्सप्लांट ‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरोग्य विभागाकडून याच वर्षी किडनी ट्रान्सप्लांटला मंजुरी मिळाली. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून मिळालेली पहिली किडनी प्रत्यारोपण मे महिन्यात झाले. त्यानंतर दुसरे आणि तिसरे आॅगस्ट महिन्यात आणि हे चौथे किडनी ट्रान्सप्लांट आहे. किडनीच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांसाठी ‘एम्स’ हे वरदान ठरत आहे.