शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे झटके! विमानाचे नागपूरला इमरजन्सी लॅँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 28, 2023 21:02 IST

दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयाच्या ५ डॉक्टरांकडून ४५ मिनिटे विमानात उपचार : सीपीआर देऊन जीवदान, रुग्णालयात भरती, प्रकृती गंभीर

नागपूर : बेंगळुरू येथून दिल्लीला विमानाने प्रवास करीत असताना एका १४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर परिस्थितीत विमानाचे नागपूर विमानतळावर रविवारी रात्री आकस्मिक लॅण्डींग करण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. मुलीवर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दिल्ली एम्सच्या पाच डॉक्टरांनी विमानात केले उपचारविस्तारा एअरलाइन्सचे यूके८१४ विमान बेंगळुरूहून दिल्लीला जात होते. विमानातील १४ महिन्याच्या मुलीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध पडली. अशा परिस्थितीत याच विमानातून प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्स हॉस्पिटलचे वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. नवदीप कौर, वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन, डॉ. ओशिखा आणि वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट अविचला तक्षक या पाच डॉक्टरांनी गंभीर वैद्यकीय परिस्थितीत मुलीला सीपीआर प्रदान करून जीव वाचविण्याच्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या. तिचे पल्स गायब होते. हातपाय थंड पडले होते. ओठ पांढरे झाले होते. या डॉक्टरांनी तिच्यावर मर्यादित संसाधनाने तब्बल ४५ मिनिटे उपचार केले. त्यादरम्यान तिला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर तिचा श्वास पुन्हा सुरू झाला.

रुग्णाला खासगी रुग्णालयात केले भरतीरुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे विमान कंपनीच्या टीमने आपत्कालीन लँण्डींगसाठी नागपूर विमानतळ प्राधिकरणांशी संपर्क साधला. विमान नागपूर विमानतळावर उतरताच डॉक्टरांनी तिची तपासणी करून पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने किम्स-किंग्सवे हॉस्पिटल्समध्ये भरती केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. बालरोग आणि निओनॅटोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कुलदीप सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर उपचार सुरू आहेत. रूग्ण व्हेंटिलेटरवर असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग व कम्युनिकेशन) एजाज शामी यांनी दिली.विमान रात्री १२.२० वाजता रवानामेडिकल इर्मजन्सीच्या कारणांनी रविवारी रात्री १०.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरलेले विस्तारा एअरलाईन्सचे विमान रात्री १२.२० वाजता दिल्लीकडे रवाना झाले. १४ महिन्यांची ही मुलगी बांग्लादेशची असून उपचारासाठी तिला बेंगळुरू येथे आणण्यात आले होते. उपचारानंतर तिला दिल्लीला आणि तेथून बांग्लादेशला नेण्यात येणार होते.

टॅग्स :doctorडॉक्टर