शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; नागपुरी स्वादाची कलावंतांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:46 IST

भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला.

ठळक मुद्देरात्री ४ पर्यंत चालल्या भोजनावळी भोजनाने केले सर्वांना तृप्त

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्य संमेलन असो, की साहित्य संमेलन, भोजनावरून हमखास हे संमेलन वादातीत ठरतात. पण नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन त्याला अपवाद ठरले आहे. भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला. गेल्या तीन दिवसात हजारो रसिक व कलावंतांनी भोजनाचा आस्वाद घेतला.सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, परत चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असे भोजनाचे नियोजन ठेवले होते. नाट्य संमेलनाच्या भोजन समितीने या भोजनाचे उत्कृ ष्ट नियोजन केले होते. नागपुरी ठेचा, मिसळ भाकर, पुरणपोळी, पाटोडी, दाळकांदा, मुगाचा शिरा, गुलाबजाम, मसाले भात असा बेत दररोजच्या जेवणात आहे. सकाळी ८ वाजतापासून सुरू होणारी ही खानावळ रात्री उशिरापर्यंत सुरू असे. भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर त्यांनी पहाटे ४ वाजता जेवणाची मागणी केली. तेव्हा भोजन समितीच्या सदस्यांनी त्यांना भोजन उपलब्ध करून दिले. नाट्य संमेलनासाठी आलेले सिने कलावंतामध्ये अलका कुबल, मोहन जोशी, ऐश्वर्या नारकर यांच्यासह अनेकांनी भोजनाचा आस्वाद येथे घेतला. प्रत्येकाच्या तोंडातून नागपुरी स्वाद आणि भोजनाच्या आयोजनाची तारीफच झाली. रसिकजनही नाट्य संमेलनाचा आस्वाद घेतानाच भोजनाचाही मनसोक्त आस्वाद घेत होते.नाट्य संमेलनाच्या नागपूर शाखेने भोजन समिती तयार केली होती. यात समिती प्रमुखासह ५० सदस्यांची नियुक्ती केली होती. तीन शिफ्टमध्ये हे काम होत होते. विशेष म्हणजे सभागृह परिसरात किचनला परवानगी नव्हती. त्यामुळे दोन किलोमीटरवरून अन्न आणावे लागत होते. अशातही रात्री उशिरापर्यंत कलावंतांनी मागणी केली तेव्हा त्यांना भोजन उपलब्ध करून दिले. समितीने येणाऱ्या प्रत्येकाला तृप्त करून सोडले. विशेष म्हणजे प्रत्येकानेच भोजनाची तारीफ केली.प्रवीण देशकर, भोजन समिती प्रमुख

टॅग्स :Natakनाटक