शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Corona Virus; उपराजधानीत ९६ दिवसांत आकडा पोहोचला १००५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 07:47 IST

नागपुरात पहिले १०० रुग्ण गाठण्यास ४४ दिवस लागले तर, ५०० रुग्णांसाठी ८० दिवस लागले, मात्र गेल्या १६ दिवसात ५०० रुग्णांची भर पडली. एकूणच ९६ दिवसात हजार रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देमृत्यूदर कमी, तरी नागपूरकरांची चिंता वाढली!३६ नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. रविवारी ३६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या १००५वर पोहचली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिले १०० रुग्ण गाठण्यास ४४ दिवस लागले तर, ५०० रुग्णांसाठी ८० दिवस लागले, मात्र गेल्या १६ दिवसात ५०० रुग्णांची भर पडली. एकूणच ९६ दिवसात हजार रुग्णांची नोंद झाली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ११ रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. या शिवाय जुनी मंगळवारी येथील एक तर डोबीनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सतरंजीपुरा येथील एक गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली आहे. खासगी प्रयोगशाळेतून उमरीग्राम येथून एक, जयताळा येथून एक, रिधोरा काटोल येथून एक व तीन नल चौक इतवारी येथून दोन असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. माफसू प्रयोगशाळेतून आठवा मैल वाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक एसआरपीएफ, दोन एमआयडीसी श्रमिकनगर, सहा नाईक तलाव, एक नरसाळा, एक सावरबांधे ले-आऊट, एक आर्यनगर, एक रामेश्वरी तर एक ब्रह्मपुरी येथील आहे. सावरबांधे ले-आऊट व नरसाळा परिसरात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या या ३६ रुग्णांना मेयो, मेडिकल व एम्समध्ये भरती करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पहिल्या ४४ दिवसात १०० रुग्णाची नोंदनागपुरात २० दिवसानंतर पहिल्या ५० रुग्णांची नोंद झाली. ४४ दिवसानंतर ही संख्या वाढून १०० वर पोहचली. मात्र त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. पुढील १२ दिवसात १०० रुग्णांची भर पडत हा आकडा २२९ वर पोहचला. त्यानंतर सहा दिवसाने ३००, नऊ दिवसाने ४०४, आठ दिवसाने ५०१, पाच दिवसाने ६०२, चार दिवसाने ७०७, तीन दिवसाने ८६२, एक दिवसानंतर ९२१ तर तीन दिवसाने १००५ रुग्ण झाले.

प्रशासनाचे नियोजन यशस्वीनागपूर उपराजधानीचे शहर असताना, लोकसंख्या व रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी मृत्यूदर असल्याचे पुढे आले आहे. देशात कोरोनाबाधित मृत्यूचा दर २.८० टक्के आहे. महाराष्टÑाचा मृत्यूदर ३.६६ टक्के, विदर्भाचा मृत्यूदर ३.२५ टक्के, तर नागपूरचा मृत्यू दर केवळ १.६ टक्के आहे. रुग्णांचे योग्य व्यवस्थापन, मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक सोयी सुविधा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केलेले नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.

मेयोतून आठ रुग्ण घरी परतलेनाईक तलाव येथून तीन, भानखेडा येथून तीन, एक अमरावती रोड तर एक रुग्ण जुनी मंगळवारी येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहायचे आहे. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१५ झाली आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस