शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

नागपुरात  कोरोना विषाणूचे ९४ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:31 IST

कोरोना विषाणूबाधितांची संख्या गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर असली तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे चार पॉझिटिव्ह सोडल्यास इतर सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे१७ नमुने निगेटिव्ह : मेयो, मेडिकलमध्ये १९ रुग्ण दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूबाधितांची संख्या गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर असली तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे चार पॉझिटिव्ह सोडल्यास इतर सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी विलगीकरण कक्षात आलेल्या ७७ संशयित रुग्णांसह मेयो, मेडिकलसह इतर जिल्ह्यातून तब्बल ९४ संशयित रुग्णांची नोंद झाली. यातील पहिल्या टप्प्यात १७ संशयिताचे नमुने तपासण्यात आले असता ते निगेटिव्ह आले. तर दुसऱ्या टप्प्यात २६वर नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या मेयोमध्ये सहा तर मेडिकलमध्ये १५ संशयितांना दाखल केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. काही नागरिक याला प्रतिसाद देत असले तरी काहींना याबाबत गंभीरता नाही. यामुळे सोमवारपासून शासनाने कठोर पावले उचलले आहेत. संचारबंदी लागू केली आहे. याचा प्रभाव कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टरांनी लोकांना घराबाहेर न पडण्याची, वारंवार हात धुण्याची, सर्दी-खोकला-ताप असलेल्या रुग्णांनी तोंडावर मास्क बांधून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या ७७ प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या संशयित रुग्णांसोबतच ९४ संशयितांची नोंद करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यात आलेल्या १७ नमुन्यांमध्ये चार अकोला, चार मेडिकल, तीन मेयो, तीन अमरावती, दोन गडचिरोली व एक गोंदिया येथून नमुने आले होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर दुसऱ्याटप्प्यात २६ नमुने तपासणीसाठी आले. याचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.विलगीकरण कक्षात १६४ प्रवासीसिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला विलगीकरणाचे स्वरूप देण्यात आले आहे. या प्रवाशांसाठी इमारत क्र. १ येथे १५० तर इमारत क्र. २ मध्ये ५० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रविवारी इमारत क्र. १ येथे ८७ प्रवासी थांबले होते. सोमवारी यात ७७ प्रवाशांची भर पडल्याने यांची संख्या १६४ झाली आहे. यातील सहा रुग्णांना मेयोमध्ये पाठविण्यात आले. सध्या १५८ प्रवासी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.मेयो, मेडिकलमध्ये १५ संशयित दाखलमेडिकलमध्ये आज दोन पुरुष व सात महिलांसह नऊ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात ३३ वर्षीय पुरुषाची पार्श्वभूमी अमेरिका प्रवासाची आहे तर ६६ वर्षीय पुरुष हे वैद्यकीय कर्मचारी आहेत. महिलांमध्ये ४२ वर्षीय, ४१ वर्षीय, ५० वर्षीय, २७ वर्षीय, ३२ वर्षीय व ३८ वर्षीय व ४० वर्षीय महिला आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल