नागपूर : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येच्या तुलनेत जास्त रुग्ण बरे होत आहेत. मंगळवारी २२४ नवे रुग्ण आढळून आले असताना त्यापेक्षा अधिक ३२७ रुग्ण बरे झाले. याचा दर ९४.५७ टक्क्यांवर गेला आहे. आज ६ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १३४७१६ झाली असून मृतांची संख्या ४१७१वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात १२७३९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १०१९६५ तर ग्रामीणमधील २५४३४ रुग्ण बरे झाले आहेत. आज ३८८४ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ३३६२ आरटीपीसीआर व ५२२ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. आरटीपीसीआरमधून १९५ तर अँजिटेनमधून २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये शहरातील १८३, ग्रामीणमधील ३८ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील १, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. शहरातील ६ शासकीय प्रयोगशाळांमध्ये क्षमतेपेक्षा कमी तपासणी होत आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत १५७, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १७७, मेयोच्या प्रयोगशाळेत ५९, माफसूच्या प्रयोगशाळेत ६, नीरीच्या प्रयोगशाळेत १०८, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १९५, खासगी लॅबमध्ये २८८४ रुग्णांची चाचणी करण्यात आली.
-रुग्णालयांमध्ये कमी झाले रुग्ण
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वच खासगी कोविड हॉस्पिटलमधील खाटा फुल्ल झाल्या होत्या. रुग्णांवर ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली होती. त्या काळात ३५००वर रुग्ण विविध रुग्णालयात भरती होते. सध्या ही संख्या कमी होऊन ७८९वर आली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये आहेत. तर, अनेक खासगी कोविड हॉस्पिटलच्या खाटा रिकाम्या आहेत.
-दैनिक संशयित : ३८८४
-बाधित रुग्ण : १३४७१६
_-बरे झालेले : १२७३९९
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३१४६
- मृत्यू : ४१७१