शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाने सायबरटेकचे ९३ लाख रोखले : मालमत्तांचे सर्वेक्षण अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 21:19 IST

शहरातील सर्व मालमत्तावर कर आकारला जावा यासाठी खासगी कंपनीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. ठरलेल्या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय महापालिके च्या सभागृहात घेण्यात आला होता. त्यानुसार सायबरटेक सिस्टीम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेडचे ९३ लाखांचे बिल रोखण्यात आले आहे. तसेच या कंपनीला एक लाख तर अनंत टेक्नॉलॉजी कंपनीला ५० हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीने आकारला एक लाख दंड : ३१ मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्व मालमत्तावर कर आकारला जावा यासाठी खासगी कंपनीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. ठरलेल्या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय महापालिके च्या सभागृहात घेण्यात आला होता. त्यानुसार सायबरटेक सिस्टीम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेडचे ९३ लाखांचे बिल रोखण्यात आले आहे. तसेच या कंपनीला एक लाख तर अनंत टेक्नॉलॉजी कंपनीला ५० हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.सायबरटेकने शहरातील ५ लाख ७२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करून ७ लाख ८६ हजार युनिटची नोंद केली. सर्वेक्षणाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने मालमत्ता विभागाला मालमत्ताधारकांना डिमांड वाटप करणे शक्य झाले नाही. याचा कर वसुलीला फटका बसला. त्यामुळे पुन्हा ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकारांना दिली.१० सप्टेंबर २०१५ ला सायबरटेकला शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मालमत्तांचा डेटा संग्रहित करून त्या आधारावर कर वसुली करण्याचा महापालिकेचा मानस होता. परंतु सर्वेक्षण २२ महिन्यात पूर्ण करावयाचे होते. मात्र निर्धारित कालावधीत ते पूर्ण झाले नाही.त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१८, ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. उर्वरित मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ३ महिन्यांचा कालावधी वाढवून ३०जून २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. मे. अनंत टेक्नॉलॉजी कंपनीला जोडीला देण्यात आले. या कंपनीवर ५६ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातील ५०४६८ मालमत्ता बंद अवस्थेत होत्या. अशा परिस्थितीत डेटा संकलित करणे अवघड होते. तसेच ७२ हजार मालमत्तांचा डेटा पूर्ण प्राप्त झाला नाही. यात ६८ हजार खुले भूखंड तर १४ हजार मालमत्तांचा समावेश आहे.डिमांड ३५० कोटीवर जाण्याची अपेक्षासर्वेक्षणामुळे शहरातील ६.५० लाखाहून अधिक मालमत्ता रेकॉर्डला येतील. मालमत्ता वाढल्याने मालमत्ता कराची वसुली वर्षाला ३२५ कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. सध्या दरवर्षी १६५ कोटींच्या डिमांड पाठविल्या जातात. मालमत्ता कराची २७३ कोटींची थकबाकी आहे. यात शासकीय कार्यालयांकडे ६३ कोटी तर न्यायालयीन वा अपिलातील मालमत्तांची १०६ कोटींची थकबाकी असल्याचे वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.सायबरटेकला ५.३१ कोटी दिलेसायबरटेक कंपनीला ९ कोटी द्यावयाचे आहे. यातील ८ कोटींचे बिल मालमत्ता विभागाकडे सादर केले. यातील ५.२३ कोटींची रक्कम देण्यात आलेली नाही. उर्वरित ३.६९ कोटी देणे बाकी आहे. यातील ९३ लाखांची रक्कम रोखण्यात आली आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर