शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

भूजलवाढीसाठी राज्यात ९२५ कोटीचा प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

नागपूर : राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. ...

नागपूर : राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांमधील १,४४३ गावांची निवड करण्यात आली असून यात विदर्भातील नागपूर, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून, यासाठी ९२५ कोटी ७७ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राबविताना अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार, अतिशोषित ७४, शोषित ४, अंशत: शोषित असलेली १११ पाणलोट क्षेत्रे आहेत. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षांच्या काळात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार केले जाणार आहेत.

...

या जिल्ह्यात राबविणार योजना

राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार असून यात नागपूर, अमरावती, बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्ह्यांसह जालना, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण १८९ पाणलोट क्षेत्रांपैकी १३ जिल्ह्यातील ३८ तालुक्यांमधील ७३ पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या १,३३९ ग्रामपंचायतींमधील १,४४३ गावांची निवड यात करण्यात आली आहे.

...

अंमलबजावणीसाठी समित्या

योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन राज्यस्तरीय समित्या, तीन जिल्हास्तरीय समित्यांचे गठन केले जाणार आहे. यातून योजनेवर नियंत्रण राखले जाईल.

भूजलसंबंधी माहिती व अहवाल सर्वसामान्य नागरिकांना कळावा, यासाठी संकेतस्थळ तयार केले जाईल. यासाठी ७३ कोटीची तरतूद आहे. कार्यक्षम पाणी वापर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी २९५ कोटीची तरतूद आहे तर, भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी ११० कोटी रुपयाची तरतूद यात आहे.

...

ही आहेत वैशिष्ट्ये

- सूक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर

- मातीमधील आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर

- पाणी उपलब्धतेनुसार पीक संरचना आदी उपाययोजना प्रस्तावित

- सर्व उपाययोजना व कामे पूर्ण झाल्यावर त्रयस्थ एजन्सीकडून निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीचा अभ्यास

- भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना

...

येथे राबविणार योजना

जिल्हा तालुके पाणलोट क्षेत्र ग्रामपंचायती गावे

नागपूर २ २ ७६ १२३

अमरावती ३ ६ २१७ २१७

बुलडाणा १ ४ ६८ ६८

पुणे ३ ५ ११० ११८

सातारा ३ ३ ११४ ११४

सोलापूर ४ ५ ११५ ११७

नाशिक २ ९ ११६ १२९

अहमदनगर ३ ६ १०१ १०९

जळगाव ४ ६ १०१ ११४

जालना ३ ५ ५० ५०

लातूर ४ ९ १२१ १३६

उस्मानाबाद २ ७ ५५ ५५

...