शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये ९० हजार जागा रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 22:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. हा निर्णय महाविद्यालयांमध्ये असलेल्या रिकाम्या जागा बघता घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाने ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली प्रवेशाची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. हा निर्णय महाविद्यालयांमध्ये असलेल्या रिकाम्या जागा बघता घेण्यात आला आहे.सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत विद्यापीठामध्ये ९० हजारहून अधिक जागा रिकाम्या आहेत. सर्वाधिक ३२ हजार जागा कला शाखेमध्ये भरणे आहे तर वाणिज्य शाखेत २८ हजारहून अधिक जागा अद्याप भरलेल्या नाहीत. वर्तमानात अभियांत्रिकी व फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी नसल्याने, त्याचा सर्वाधिक लाभ विज्ञान शाखेला झाला आहे. या अभ्यासक्रमातील सर्वाधिक जागा भरलेल्या आहेत. तरीदेखील अजूनही विज्ञान शाखेच्या १७ हजार जागा रिकाम्या आहेत आणि अन्य शाखांमध्येही बऱ्याच जागा अद्याप भरलेल्या नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम वर्षाशिवाय अन्य सत्रासाठीचे प्रवेशही कमी झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज सादर केले नाहीत. रिकाम्या जागा बघता महाविद्यालयांकडूनच प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगानेच प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितींतर्गत होतात, त्यांच्यासाठी ही मुदत लागू राहणार नाही. या संदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcollegeमहाविद्यालय