शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के अन्ननलिकेच्या कॅन्सरचे उशिरा निदान  : श्रीकांत मुकेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:59 IST

साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.

ठळक मुद्दे‘जीपीकॉन-२०२०’ परिषद शुक्रवारपासून

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेचा कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दीर्घ कालावधीच्या अ‍ॅसिडिटीमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरने अरुंद झाली तरी त्याचा त्रास जाणवत नाही. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष होते. त्रास वाढल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. यामुळे साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.मिडास मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्यावतीने जठराच्या आजारावर ‘जीपीकॉन-२०२०’चे शुक्रवार २४ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे; याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. प्रशांत देशमुख व डॉ. सौरभ मुकेवार उपस्थित होते.डॉ. मुकेवार म्हणाले, या परिषदेत अ‍ॅसिडिटी, डायरिया, यकृताचा आजार, ‘हेपेटायटिस-बी’ आदी आजारांच्या संदर्भातील अद्ययावत माहिती, नव्या उपचार पद्धतीवर चर्चासत्र, नव्या एण्डोस्कोपीच्या वापरातून आजाराचे निदान व उपचार, याशिवाय ‘कॉलीन जोस्कोपी’च्या मदतीने उपचार यावर प्रकाश टाकला जाणार आहे. परिषदेत डॉ. कुलविंदर दुवा, डॉ. सौरभ मुकेवार, डॉ. नरेश भट, डॉ. अजय दुसेजा, डॉ. रुपरॉय हे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. अजिनो मोटोमुळेही होऊ शकतो कॅन्सर‘अजिनो मोटो’च्या (मोनोसोडियम ग्लुटामेट) वापरामुळे पदार्थांची चव वाढत असली तरी याचे खूप वाईट परिणाम शरीरावर होतात. विशेषत: अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. गिळायला त्रास होणे, छातीत दुखणे, घास खाली घालण्यासाठी घासानंतर पाणी पिणे आवश्यक ठरणे, पुढे पुढे पाणी पितानाही अडकल्याचा त्रास जाणवणे व पाठीत दुखणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. हा कॅन्सर टाळण्यासाठी रोजच्या आहारात भाज्या, फळे, झिंकचे प्रमाण वाढवायला हवे, असा सल्लाही डॉ. मुकेवार यांनी दिला.अ‍ॅसिडिटीवर स्वत:हून औषधे घेणे टाळावेएका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मुकेवार म्हणाले, अ‍ॅसिडिटी हा सामान्य आजार असला तरी यावर स्वत:हून औषधे घेऊ नये. वारंवार स्वत:हून औषधे घेतल्यास अतिसार, न्यूमोनिया होण्याचा धोका होऊ असू शकतो. यासोबतच मूत्रपिंडाचे आजार, डिमेन्शिया, हृदयविकाराचे आजारही होऊ शकतात. परंतु यासंदर्भातील पुरावे अद्यापही अपुरे आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूर