शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ९० टक्के संशयितांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:12 IST

आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही.

ठळक मुद्देअहवाल काय ते तरी सांगा? ५६० संशयित संस्थात्मक अलगीकरण कक्षात

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. आम्हाला घरी सोडू नका, किमान अहवाल सांगा, अशी मागणी केली जात आहे.दिल्लीहून आलेले आणि सतरंजीपुऱ्यातील मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेले संशयित मोठ्या संख्येत संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. पहिला, सातवा व १४ दिवसानंतरचा नमुना निगेटिव्ह आल्यावर आणि लक्षणे नसल्यावरच संशयितांना घरी सोडण्याचा नियम आहे. परंतु अलिकडे हा नियम काहींसाठी बदलला आहे. पहिल्या व सात दिवसानंतर निगेटिव्ह येणाऱ्यानमुन्याच्या संशयिताला घरी पाठविले जात आहे. यामुळे अनेकांना आपला अहवाल काय आला, याची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार, या पाचही संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या ५६० संशयितांमधील ९० टक्क्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे. यातील बहुसंख्य संशयितांचा पहिला नमुना निगेटिव्ह आला आहे. १३ व १४ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवालांची अनेकांना प्रतीक्षा आहे. काही संशयितांच्या मते, क्वारंटाइन होऊन सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पहिला नमुना निगेटिव्ह आला आहे. सात दिवसानंतरचे नमुनेही घेतले आहेत. परंतु चार दिवस होऊनही अहवाल काय आला, याची माहिती सांगितली जात नाही. आमदार निवासात व लोणारा येथील अलगीकरण कक्षात काही संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मनात एक भीती असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार काही लोकांंचा अहवाल सात दिवसानंतर निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले जात आहे. हाच नियम सर्वांसाठी का नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर