शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाच मार्गावर धावणार फक्त ४० बस:  बुटीबोरी, हिंगणा मार्गावर सर्वाधिक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 22:48 IST

NMC Bus service begin from Wednesday , Nagpur News २१९ दिवसानंतर आज बुधवारी नागपूर शहरात आपली बस(शहर बस)सेवा सुरू होत आहे. टप्प्याटप्प्याने रस्त्यावर बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन समितीने सुरुवातीला ३० टक्के बस चालविण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी पाच मार्गावर फक्त ४० बस धावतील.

ठळक मुद्देमनपाच्या परिवहन विभागाने केले नियोजनपुढील आठवड्यात धावणार ९० बस

  लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :   २१९ दिवसानंतर आज बुधवारी नागपूर शहरात आपली बस(शहर बस)सेवा सुरू होत आहे. टप्प्याटप्प्याने रस्त्यावर बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन समितीने सुरुवातीला ३० टक्के बस चालविण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी पाच मार्गावर फक्त ४० बस धावतील. सोमवारी २ नोव्हेंबरपासून ९० बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी बर्डी ते हिंगणा ग्रामीण रुग्णालय मार्गावर १५ स्टँडर्ड बस धावतील. याशिवाय बर्डी ते बुटीबोरी एमआयडीसी गेट मार्गावर ९, बर्डी ते खापरखेडा दरम्यान ३, पिपळा फाटा ते हजारीपहाड दरम्यान ५ स्टँडर्ड बस धावतील. तर पारडी ते जयताळा महाल मार्गे ८ मिडी बस धावतील.

पुढील आठवड्यात हिंगण्यासाठी १५ आणि बुटीबोरीसाठी १४ बसेस दर १० मिनिटाच्या अंतराने सोडल्या जातील. एकूण १५ मार्गावर बस सुरू होतील. १३१६ फेऱ्यांच्या माध्यमातून एकूण २०९४०.३ कि.मी.बस धावणार असल्याचा विभागाचा अंदाज आहे. प्रवाशांची संख्या विचारात घेऊन बसची संख्या वाढविली जाईल.

बुटीबोरी, हिंगणा परिसारात उद्योग आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. सणामुळे मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत बस बंद असल्याने ये-जा करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळेच बससेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी ३० टक्के बस चालविण्याला परवानगी दिली. ९० धावतील तर ९ सज्ज राहतील. एखादी बस बंद पडल्यास या बस संबंधित मार्गावर धावतील.

मिळालेल्या माहितीनुसार बर्डी ते खापरखेडा १०, पिपळा फाटा ते हजारीपहाड १०, पारडी ते जयताळासाठी ८ खरबी ते जयताळा १० बस सोडण्यात येतील. याशिवाय अन्य मार्गावर बस सोडण्यात येतील. राज्य परिवहन महामंडळाच्या दिशानिर्देशाचे प्रवाशांना पालन करावे लागेल. मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. सकाळी ६ ते रात्री ८.३० दरम्यान विविध मार्गावर बस धावतील.

कंडक्टर-ड्रायव्हरची कमी

मागील सात महिन्यापासून बस सेवा बंद असल्याने कंडक्टर व ड्रायव्हर दुसऱ्या कामाला लागले आहे. यामुळे बस सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंडक्टर-ड्रायव्हर उपलब्ध करण्यासाठी तीन बस ऑपरेटरला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. भविष्यात बस संख्या वाढवितानाही मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यामुळे अडचणी येण्याची शक्यता आहे. तीन हजारांच्या आसपास कर्मचारी व अधिकारी या सेवेशी जुळले आहेत.

दर महिन्याला ३.१० कोटींचा तोटा

परिवहन विभागाच्या अंदाजान्रसार महिनाभर ९० बस चालवावयाच्या झाल्यास ३.१० कोटी रुपयाचा तोटा होणार आहे. एक बस दररोज २००कि.मी.धावते. तिकिटातून दररोज २.५३ लाखांचे उत्पन्न होते. अन्य खर्च गृहीत धरता ९० बस चालविण्यासाठी महिन्याला ३.८६ कोटी खर्च येईल.

२ नोव्हेंबरपासून या मार्गावर धावतील बसेस

मार्ग बसेस फेऱ्या

बर्डी ते हिंगणा १५ २२०

बर्डी ते बुटीबोरी १४ १८६

पारडी से जयताळा ८ ११२

पिपला फाटा ते हजारी पहाड १० १४६

बर्डी ते खापरखेडा १० १३७

बर्डी ते पारडी ६ ८२

बर्डी ते ऑर्डनन्स फॅक्ट्री ६ ८६

बर्डी ते फेटरी २ ३६

बर्डी ते शेष नगर २ ३४

बर्डी ते बहादुरा फाटा ५ ८२

खरबी ते जयताळा ८ १३०

खरबी ते पन्नासे ले-आऊट १ २२

पिपला फाटा तेहजारी पहाड १ १५

नारा ते मेडिकल चौक १ १४

नारी ते मेडिकल चौक १ १४

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक