शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९ हजार घरं रात्रभर अंधारात : दक्षिण नागपुरात वीजटंचाई, लोडशेडींगची शक्यता

By आनंद डेकाटे | Updated: June 16, 2025 20:19 IST

Nagpur : बेसा सबस्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण नागपुरातील रिंगरोडच्या आसपासच्या भागात रविवारी रात्रीपासून वीजटंचाई निर्माण झाली आहे. ९ हजारांहून अधिक ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. बेसा सबस्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. परंतु कित्येक तास अथक परिश्रम करूनही हा बिघाड आढळून आलेला नाही. परिणामी, परिसरात भार व्यवस्थापन केल्यानंतर तात्पुरते भारनियमन लागू करण्यात आले आहे. नागरिकांची अवस्था दयनीय आहे. वीज नसल्याने अनेक घरांमध्ये पाण्याचे संकटही निर्माण झाले आहे.

रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास, जानकी नगर वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे ३० ट्रान्सफॉर्मर काम करणे बंद पडले. जानकी नगर, अवधूत नगर, शिवशक्ती नगर, विज्ञान नगर, आकाश नगर, अमर नगर इत्यादी भागात अंधार पडला. ही भूमिगत लाईन असल्याने आणि बहुतेक परिसर काँक्रीटने झाकलेला असल्याने फॉल्ट शाेधने कठीण झाले आहे. तथापि, मानेवाडा चौकातील पेट्रोल पंपाजवळ हा बिघाड आढळून आला. परंतु या दरम्यान या लाईनवर कुठेतरी आणखी बिघाड असल्याचे आढळून आले. या बिघाडाचा शोध अजूनही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वाजता ही लाईन दुसऱ्या लाईनशी जोडण्यात आली आणि वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला. परंतु रात्रीच्या वेळी विजेची मागणी वाढल्याने परिसरात ३० तास ते ४५ मिनिटांपर्यंत लोडशेडिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

८ फूट खोल खड्डामहाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांच्या नेतृत्वाखाली दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या अनुक्रमे ८ फूट खोल आणि ८ फूट रुंद खड्डा खोदण्यात आला आहे. या जोडणीनंतर पुन्हा खड्डा खोदावा लागेल.

नागरिक संतप्तकेबल बिघाडामुळे ३० ट्रान्सफॉर्मर काम करणे बंद झाले आहेत. ९ हजार घरांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. बाधित भागातील अपार्टमेंटमध्ये पंप बंद पडल्यानेही वीज संकट निर्माण झाले आहे. आर्द्रता आणि अति उष्णतेमुळे लोकांना खूप त्रास झाला. रविवारी बिघाड झाल्याचे सांगितले जाते परंतु वीज संकट गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावरूनही योग्य माहिती मिळत नसल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर