शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

९७ लाखांच्या बाद नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:23 IST

चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली.

ठळक मुद्देबिल्डरला अटक साथीदार फरार गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली. गुन्हे शाखेच्या पथकाने वॉक्स कूलर जवळच्या एका सदनिकेत छापा घालून एका बिल्डरला अटक केली. त्याच्याकडून बाद झालेल्या ९७ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. कोट्यवधींची रोकड घेऊन त्याचे पाच ते सात साथीदार मात्र पळून गेले. या कारवाईमुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रसन्ना मनोहर पारधी (वय ४४) असून, रामदासपेठेतील सेंट्रल मॉलजवळ त्याचे निवासस्थान आहे.वॉक्स कूलर चौकाजवळच्या राणा अपार्टमेंटमध्ये काही इसम कोट्यवधींची रोकड घेऊन ‘हेरफेर’ करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन लुले, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, हवालदार बट्टूलाल पांडे,नायक महेश कुरसंगे, बलजित ठाकूर, सय्यद वाहिद आणि विजय लेकुरवाळे यांचे पथक राणा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तिसºया माळ्यावर ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत पोलिसांना बिल्डर प्रसन्ना पारधी आढळले. एका रुममध्ये स्पोर्ट बॅग पडून होत्या. त्यात चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांचे बंडल खच्चून भरले होते. पोलिसांनी पारधी यांची चौकशी केली असता, त्यांनी या नोटा आपण कुमार छुगानी (रा. खरे टाऊन) याच्या सांगण्यावरून आणल्या. तो त्याच्या बँक अधिकारी असलेल्या मित्रांच्या माध्यमातून या नोटा बदलवून देणार होता, असे पारधीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पारधीला ताब्यात घेऊन त्या नोटा जप्त केल्या आणि गुन्हे शाखेत आणले.एक्सचेंज आॅफर २५ टक्क्यांची!छुगानी याचे सदरच्या श्रीराम टॉवरमध्ये मोठे कापड शोरूम आहे. त्याची अनेक बँक अधिकाºयांशी मैत्री असून, त्यामुळे तो आणि त्याचे साथीदार या बाद झालेल्या नोटा चालवून घेण्याचा छातीठोक दावा करीत असल्याचेही सांगितले जाते. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्याची रक्कम (बाद झालेल्या नोटा) आहे, त्यांना २५ टक्के नवे चलन दिले जाणार होते, तर ७५ टक्के रक्कम छुगानी आणि त्याचे साथीदार वाटून घेण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, अकोला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बाद झालेल्या लाखोंच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या नोटा सदरमधील गुड्डू ऊर्फ इमरानने राजूच्या मदतीने दिल्या होत्या, अशी चर्चा आहे.स्थानिक व्यापारी आणि वर्धेतील डॉक्टर पळालापोलिसांनी चौकशी केली असता, आपल्यासोबत आणखी काही व्यापारी आणि वर्धेतील एक डॉक्टर अशाच प्रकारे दोन ते तीन कोटी रुपयांची रोकड घेऊन आले होते, असे पारधीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जुन्या नोटा बदलवून घेण्याच्या प्रयत्नातील बिल्डर पारधीला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वत्र वायुवेगाने पसरले. त्यामुळे या नोटा बदलवून घेण्याच्या गोरखधंद्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले. अनेक जणांनी रातोरातच नागपुरातून पलायन केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी या अपार्टमेंटमध्ये धडक देताच खाली जमलेले पाच ते सात जण पळून गेले. काही वेळेनंतर पोलीस पोहोचले असते तर हे सर्व ३०१ क्रमांकाच्या सदनिकेतच पोलिसांच्या हाती लागले असते.