शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० वर्षात रानडुकरांकडून ८९ व्यक्तींचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:56 IST

Nagpur News मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरानडुकरांचे शेतीपुढे संकट परवानगी घेऊन मारायला शेतकऱ्यांनी बंदुका आणायच्या कुठून ?

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना सर्वाधिक उपसर्ग रानडुकरांकडून आणि रानम्हशींकडून आहे. रानडुकरांना वन विभागाची परवानगी घेऊन मारता येते, मात्र त्यासाठी नाचवल्या जाणाऱ्या कागदी घोड्यांची वाट किती पहायची, आणि परवानगी मिळाल्यावर बंदुका कुठून आणायच्या, असा शेतकऱ्यांपुढे असलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजी मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संकट दोन्ही बाजूनी दिसत आहे.वन विभागाच्या नियमानुसार, बफर क्षेत्राच्या बाहेर असल्यास रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आधी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. त्यावर वन विभाग परवानगी देतो. मात्र वाट बघावी लागते. या काळात रानडुकरांकडून डोळ्यादेखत होणारी नासधूस सहन होत नसल्याने शेतकरी गोळे खायला टाकून डुकरांना ठार करतात, परस्पर विल्हेवाटही लावतात. रानडुकरांना मारणे कायद्याने गुन्हा असला तरी शेतीचे अधिक नुकसान त्यांच्याकडूनच होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी विजेचे सापळे लावतात. त्यात बरेचदा इतर वन्यजीवही मरतात.मागील १० वषार्तील रानडुकरांकडून माणसांच्या मृत्यूचा आकडा ८९ असा आहे. २०१६ मध्ये १७, २०१५ मध्ये १२, २०१३ मध्ये ११ व्यक्तींचा राज्यात रानडुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे.रानगव्यांकडूनही २३ मृत्यूरानगव्यांच्या हल्ल्यात मागील १० वर्षात २३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर नीलगायींच्या हल्ल्यातही राज्यात ७ जणांचा मृत्य झाला आहे. माकड, नीलगाय या प्राण्यांच्या हल्ल्यात दगावलेल्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते तर जखमींना ५ ते २० हजाराची भरपाई दिली जाते. वाघ, बिबट या प्राण्यांकडून होणऱ्या मृत्यूमधील नुकसानभरपाईच्या तुलनेत ही रक्कम बरीच कमी आहे. शेतकऱ्यांच्या शेताचे रानडुकरांसोबतच माकड, हरिण, रानगवे, रानम्हशी, नीलगायींकडूनही मोठे नुकसान होते. मात्र नुकसानीच्या तुलनेत पुरेशी भरपाई मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव