शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून ४० एसटींमधून ८८० मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:20 IST

कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या. त्यातून अडकून पडलेल्या नागरिकांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर (खवासा-देवरी चेकपोस्ट) सोडण्यात आले.एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील ३५ बसेस गणेशपेठ बस स्थानकावरून रवाना करण्यात आल्या. तर, दोन बसेस रामटेक आणि भंडारा रोडवरील चेकपोस्टवरून रवाना करण्यात आल्या. या शिवाय, छत्तीसगडमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील २२ मजुरांनाही देवरी सीमेवरून याच बसमधून भंडारा येथे आणण्यात आले. बेलसरे म्हणाले, ही सेवा १७ मे पर्यंत सुरू राहील. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून शेल्टरहोम तसेच अन्यत्र निवाऱ्याला असणारे कामगार, विद्यार्थी, पर्यटकांची यादी महामंडळाला दिली जात आहे. या प्रभावित नागरिकांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना बस स्थानकावर शरीरिक अंतर राखून बसविले जात आहे. प्रत्येक बसमधून फक्त २२ प्रवाशांना पाठविले जात आहे.एसटी बसची ‘ऑन दि स्पॉट’ सेवाविभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले, गणेशपेठ बस स्थानकापासून लॉकडाऊन प्रभावितांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. शहरातृून पायी जाणाऱ्या मजुरांना पारडी परिसरातील पोलीस थांबवित आहेत. त्यांना गणेशपेठ बस स्थानकावर पाठविण्याऐवजी थेट रामटेक-भंडारा रोडवर असलेल्या चेक पोस्टवरूनच त्यांच्यासाठी ‘ऑन दि स्पॉट’ बस सेवा सोमवारपासून सुरू केली आहे. या अंतर्गत सोमवारी सायंकाळी रामटेक आणि भंडारा चेक पोस्टवरून प्रत्येकी दोन बसेस ४४ मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार