नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३३,७३,९२९ चाचण्या झाल्या. यातून ४,९२,९८४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, जवळपास ८५ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या. शुक्रवारी चार रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, आज ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूची संख्या स्थिर होती.
कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरू लागली. मागील दोन महिन्यात निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात ४,४३१ चाचण्या झाल्या यातून केवळ चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण शहरातील आहेत. शहरात आतापर्यंत २४,५९,३२६ चाचण्या झाल्या. यातून ३,४०,०४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, याचे प्रमाण ८६ टक्के आहे. ग्रामीणमध्ये आतापर्यंत ९,१४,६०३ चाचण्या झाल्या. १,४६,१२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, याचे प्रमाण ८४ टक्के आहे. ग्रामीणच्या तुलनेत शहरात निगेटिव्ह चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. आज तीन रुग्ण बरे झाले. कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ४,८२,७६८ झाली आहे. कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या १००च्या आत आली आहे. सध्या यातील ५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ४७ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत.
कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४४३१
शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९२,९८४
ए. सक्रिय रुग्ण : ९८
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,७६८
ए. मृत्यू : १०,११८