नागपूर : शहर पोलीस दलातील ८३९ पोलीस कर्मचार्यांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. गेल्या एक आठवडापूर्वीपासून बदलीच्या प्रतीक्षेतील पोलीस कर्मचारी बदल्यांची यादी जाहीर होण्याची वाट बघत होते.विशिष्ट ठिकाणी तीन वर्षांंंंंचा कालावधी पूर्ण करणार्या पोलीस शिपाई, पोलीस नायक आणि पोलीस हवालदारांची दरवर्षी बदली करण्यात येते. तीन वर्षांंंंचा निकष लक्षात घेऊन वरिष्ठांनी पात्र पोलीस कर्मचार्यांच्या बदलीची यादी तयार केली. लोकसभा निवडणुकांचे मतदान संपताच ही यादी तयार करण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याबरोबर कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचे ठरले होते. मात्र, काही नेत्यांनी तीन वर्षांंंंंऐवजी बदलीसाठी सहा वर्षांंंंंचा अवधी निश्चित करावा, असा हेका धरला. त्यामुळे सहा वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार्या कर्मचार्यांची नव्याने यादी बनविण्यात आली. तीन आणि सहा वर्षांंंंंचा सेवा कालावधी एका ठिकाणी पूर्ण करणार्या कर्मचार्यांच्या दोन्ही याद्या पोलीस आयुक्तालयात तयार ठेवण्यात आल्या होत्या. महासंचालनालयातून त्याबाबतच्या आदेशाची स्थानिक वरिष्ठांना प्रतीक्षा होती. दोन दिवसांपूर्वी पुन्ही तीन वर्षांंंंंचा (अपवादात्मक स्थितीत दोन वर्षे) निकषच मान्य झाला. त्यानुसार आज ८३९ पोलीस कर्मचार्यांची बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. दुपारी १२ वाजता २३ पोलीस ठाण्यात, गुन्हे शाखा, विशेष शाखा, मुख्यालय आणि नियंत्रण कक्षातील प्रमुखांना ही यादी पाठविण्यात आली. मात्र, मोटर वाहन विभागातील (एमटी सेक्शन) कर्मचार्यांची नावे या यादीत नसल्याचे समजते. पुढच्या आठवड्यात अन्य कर्मचार्यांची बदली होणार असून, बदली झालेल्या कर्मचार्यांना दोन तीन दिवसात कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
८३९ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 5, 2014 01:09 IST